जालना - अयोध्या राम जन्मभूमी जागेचा निकाल आज (शनिवारी) सर्वोच्च न्यायालयाने दिला. या पार्श्वभूमीवर जालना शहर आणि परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस अधिक्षकांनी सर्व नागरिकांना शांतता बाळगण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा - कितीही प्रयत्न केला तरी भाजपचे सरकार येणार नाही - पृथ्वीराज चव्हाण
शहरात निकाल लागण्यापूर्वीच पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आला होता. परंतु, निकाल लागताच पोलिसांच्या अजुन काही गाड्या कार्यालयातून शहरात हलवण्यात आल्या आहेत.
पोलीस अधीक्षक एस चैतन्य यांनी स्वतः शहरात फिरून पोलीस बंदोबस्ताची पाहणी केली. शहरातील प्रत्येक चौकामध्ये पोलिसांच्या राहुट्या आणि व्हेन दिसत होत्या. शनि मंदिर चौक, मस्तगड, रहमान गंज, शिवाजी पुतळा, आदी सर्व मध्ये सर्व भागांमध्ये फिरुन पोलीस अधीक्षकांनी पाहणी केली.
हेही वाचा - अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सर्वांनी स्वीकारावा- उज्ज्वल निकम