ETV Bharat / state

जालन्यात मोतीबाग तलावात गणपती विसर्जन; खोतकर दांपत्याच्या हस्ते मानाच्या गणपतीची आरती

जालन्यात मोतीबाग तलाव परिसरात नगर परिषदेच्यावतीने गणपती विसर्जनाची तयारी करण्यात आली होती. कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी मोतीबाग परिसरात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. यावेळी अग्निशामन विभागाच्‍या चार टीम तलाव परिसरात सज्ज होत्या.

Jalna Ganpati Immersion at Moti talav
जालन्यात मोतीबाग तलावात गणपती विसर्जन
author img

By

Published : Sep 20, 2021, 4:04 AM IST

जालना - कोरोनाच्या सावटाखाली गणपती विसर्जनाला जालन्यात उत्साहात सुरुवात झाली होती. शहरातील मोतीबाग तलाव परिसरात नगर परिषदेच्यावतीने गणपती विसर्जनाची तयारी करण्यात आली होती. कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी मोतीबाग परिसरात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. यावेळी अग्निशामन विभागाच्‍या चार टीम तलाव परिसरात सज्ज होत्या. जालना शहरातील नवयुवक गणेश मंडळाच्या मानाच्या गणपतीची आरती व पूजा अर्चना करून खोतकर दांपत्याच्या हाताने मानाच्या गणपतीला निरोप देण्यात आला. दरम्यान, नियमाचा भंग केल्या प्रकरणी गणेश मंडळावर पोलीस अधीक्षकांनी दिले कारवाईचे आदेश दिले आहेत.

नगर परिषदेचे कर्मचारी गणेश विसर्जन करताना

नगर परिषदेकडून चोख बंदोबस्त -

जालना नगर परिषदेच्यावतीने मोतीबाग तलाव परिसरात गर्दी टाळण्यासाठी शहरात गणपती मूर्तींचे संकलन केल्या गेले. संकलित केलेल्या गणपती मूर्ती वाहनाच्या साहाय्याने मोतीबाग तलाव परिसरात आणून विधिवत पद्धतीने पूजा अर्चना करून हे विसर्जन केल्या. यासाठी नांदेड येथील गोदावरी जीवरक्षक दलाच्या टीमची मदत घेतली होती. या कामासाठी नगरपरिषदेचे 400 कर्मचारी अधिकारी राबत होतो. कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी मोतीबाग परिसरात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.

अर्जुन खोतकर यांची प्रतिक्रिया

खोतकर दांपत्याच्या हाताने मानाच्या गणपतीला पूजा अर्चना करून निरोप -

जालना शहरातील मानाचा गणपती समजला जाणारा नवयुवक गणेश मंडळाचा मानाचा गणपतीची आरती माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि सीमा खोतकर यांच्या हस्ते करण्यात आली. जालना शहरातील १९४७ चाळीस पासून या गणपतीची स्थापना करण्यात आल्याने जालना शहरातील पहिला मनाचा गणपती म्हणून नवयुवक गणेश मंडळाला मान दिला जातो. खोतकर दांपत्याच्या हाताने आरती झाल्यानंतर गणपती विसर्जन मिरवणूक काढण्यात आली.

पोलीस अधीक्षक विनायक देशमुख पाहणी करताना

नियमांचे भंग केल्याप्रकरणी कारवाई आदेश -

गणपती विसर्जन मोतीबाग तलावात परिसरात, 4 फुटा पेक्षा जास्त मोठा गणपती विसर्जनास आला होता. त्यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी गणपती मूर्तीची पाहणी करून नियमांचे भंग केल्याप्रकरणी गणपती मंडळाच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

हेही वाचा - गणपती विसर्जनात गावठी पिस्टल जप्त; जालन्यात 21 वर्षीय तरुणाला अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.