ETV Bharat / state

Jalna Fraud Case : दोन मुलींच्या आईने दोन लाखांसाठी केलं दुसरं लग्न; पळ काढताच पोलिसांनी ठोकल्या बेड्या - जालन्यात दोन लाख रुपयांना गंडा घालणाऱ्या महिलेला अटक

तरुणाकडून दोन लाख रुपये घेऊन विवाह लावला. नंतर दहा दिवस संसार केला. अन् परत आपल्या पहिल्या पती व आई वडिलांकडे पळून जाण्याच्या ( woman arrested for cheating on second husband ) तयारीत असलेल्या नववधूला भोकरदन पोलिसांनी बेड्या ठोकल्या ( bhokardan police arrested woman ) आहेत

Jalna Fraud Case
Jalna Fraud Case
author img

By

Published : Jul 7, 2022, 10:33 PM IST

जालना - तरुणाकडून दोन लाख रुपये घेऊन विवाह लावला. नंतर दहा दिवस संसार केला. अन् परत आपल्या पहिल्या पती व आई वडिलांकडे पळून जाण्याच्या ( woman arrested for cheating on second husband ) तयारीत असलेल्या नववधूला भोकरदन पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तसेच, या प्रकरणातील नऊ जणांविरुद्ध भोकरदन पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला ( bhokardan police arrested woman ) आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील सोयगाव देवी मधील रावसाहेब भाऊसाहेब सहाणे ( वय 25 ) हा तरुण नेवास्यातील खाजगी कंपनीत कामाला आहे. या तरुणाच्या विवाहासाठी नातेवाईकाने रमेश शेळके यांच्या मध्यस्थीने एक मुलगी पहिली. रमेशने सोनी वानखेडे नावाची मुलगी असून, ती आश्रमात राहते. तसेच, लग्न करायचे असल्यास तिला २ लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. मुलगी मिळत नसल्याने रावसाहेबांचे नातेवाईक लग्नास तयार झाले. त्यानंतर, २४ जून रोजी वाडी येथील गणपती मंदिरात रावसाहेबचा विवाह सोनी वानखेडे हिच्या सोबत लावून देण्यात आला. यावेळी लग्नाला मुलीच्या आईसह आदी नातेवाईकांची उपस्थिती होती.

लग्न लावल्यानंतर वर पक्षातर्फे त्यांना 2 लाख रुपये देण्यात आले. लग्नानंत रावसाहेब आणि सोनी हे दाम्पत्य सोयगाव देवी येथे आले. गावातील भावबंधाच्या उपस्थितीत पुन्हा 25 जून रोजी देविदास बाबा यांच्य मठावर नवदाम्पत्याचा दुसऱ्यांदा विवाह लावण्यात आला. दरम्यान, लग्नानंतर सोनी एकदा माहेरी जाऊन आली. परत आल्यानंतर तिने रावसाहेबला मी पुन्हा एकटीच माहेरी जात आहे, असे सांगितले.

६ जुलै रोजी भोकरदन बसस्टँडवर रावसाहेब सोनीला सोडण्यास घेऊन आला. तेव्हा तिथे तिचा प्रियकर उपस्थित होता. यावरून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने रावसाहेबने पोलीस ठाणे गाठत आपल्यासोबत झालेल्या फसवणूकीची माहिती दिली. यावरुन भोकरदन पोलिसांनी नववधूला ताब्यात घेत विचारपूस केली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु, सपोनि रत्नदीप जोगदंड, सपोनि राजाराम तडवी यांनी पोलिसी खाक्या दाखवताच सोनी पोपटाप्रमाणे बोलू लागली. आपण पैसे घेऊन लग्न करत फसवण केल्याची कबुली तिने पोलिसांना दिली आहे.

दरम्यान, रावसाहेब सहाणे यांच्या तक्रारीवरून नववधू सोनी वानखेडे सह इतर नऊ जणांविरुद्ध भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी नववधू सोनी वानखेडे हिला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच तिचे लग्नातील पाहुणे मंडळी बनावट असल्याचे समोर आले आहे. सोनी ही विवाहित असून तिला दोन मुली असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

हेही वाचा - Dead Bodies found in Vena River : वेणा नदीत आढळला युवक युवतीचा मृतदेह; दगडाला दोरीने हातपाय बांधून फेकले होते नदीत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.