जालना - उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे युवतीवर झालेल्या अत्याचाराच्या संदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी हे पीडितेच्या परिवाराला भेटण्यासाठी जात होते. मात्र, रस्त्यात त्यांना पोलिसांकडून करण्यात आली. या धक्काबुक्कीच्या निषेधार्थ जालन्यात काँग्रेसच्यावतीने योगी सरकारचा निषेध करण्यात आला.
उत्तर प्रदेश मधील एका युवतीवर बलात्कार करण्यात आला होता. यानंतर तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे आज (गुरुवारी) जात असताना उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी त्यांना धक्काबुक्की केली. या प्रकाराचा निषेध म्हणून जालन्यात आज (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजता काँग्रेस पदाधिकाऱ्यांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. भगवान बाबा मंगल कार्यालयात झालेल्या या बैठकीत काँग्रेस पक्षाच्यावतीने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा निषेध करण्यात आला. तसेच अशा प्रकारची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असेही ठणकावून सांगण्यात आले.