जालना - विधानपरिषद निवडणुकीसाठी औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आज मतदान सुरू झाले आहे. जालना जिल्ह्यात २७२ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. याठिकाणी भाजप-सेना युतीच्यावतीने अंबादास दानवे तर, का काँग्रेस-राष्ट्रवादीकडून बाबुराव कुलकर्णी या दोघांमध्ये लढत होत आहे.
जालना जिल्ह्यात एकूण २७२ मतदार आहेत. त्यामध्ये ६४ जिल्हा परिषद सद्स्य, तर उर्वरित सद्स्यांमध्ये नगरपालिकेचे सद्स्य आहेत. यामध्ये जालना ६७, भोकरदन २०, जाफराभाद १९, बदनापूर १९, मंठा १९, परतूर २०, अंबड २२ अशी सद्स्यांची संख्या आहे.
जालना तहसीलमध्ये होत असलेल्या मतदान केंद्रात केंद्राध्यक्ष म्हणून निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार दिलीप शेनफड सोनवणे, तर क्षेत्रीय अधिकारी म्हणून प्रभारी तहसीलदार रमेश पोलास यांच्यासह अतुल केदार संजय तेजनकर सचिन पगारे हे अधिकारी कर्मचारी उपस्थित आहेत. दरम्यान केंद्रावर पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला असून कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.