ETV Bharat / state

जालना जिल्ह्याचा कौल कोणाला? निकालाकडे राज्याचे लक्ष

author img

By

Published : Oct 23, 2019, 7:54 PM IST

राज्याचे लक्ष लागलेल्या जिल्ह्यापैकी एक म्हणजे जालना जिल्हा. या जिल्ह्यात विधानसभेचे 5 मतदारसंघ आहेत.  2014 मधील विधानसभा मतदारसंघातील पक्षीय बलाबल बघितले तर भाजपने तीन, राष्ट्रवादीने एक आणि शिवसेनेने एक जागा जिंकलेली आहे. आता उद्या जाहीर होणाऱ्या निकालानंतर जनतेने कोणाला कौल दिला हे स्पष्ट होणार आहे.

जालना विधानसभा निवडणूक 2019

जालना - राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी २१ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल उद्या (गुरुवारी) जाहीर होणार आहे. गुरुवारी दुपारपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होणार असून राज्याचे नवे कारभारी ठरणार आहेत. राज्याचे लक्ष लागलेल्या जिल्ह्यापैकी एक म्हणजे जालना जिल्हा. या जिल्ह्यात विधानसभेचे 5 मतदारसंघ आहेत. 2014 मधील विधानसभा मतदारसंघातील पक्षीय बलाबल बघितले तर भाजपने तीन, राष्ट्रवादीने एक आणि शिवसेनेने एक जागा जिंकलेली आहे.

  • जालना विधानसभा मतदारसंघ क्रमांक 101

विद्यमान आमदार - अर्जुन खोतकर (शिवसेना)

मुख्य लढत - शिवसेनेचे अर्जुन खोतकर विरुद्ध काँग्रेसचे कैलास गोरंट्याल

1990 पूर्वी एक अपवाद वगळता जालना मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून प्रसिद्ध होता. 1990 मध्ये प्रथमच शिवसेनेकडून राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे या मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर झालेल्या सलग सहा निवडणुकींपैकी दोन वेळा काँग्रेसचे कैलास गोरंट्याल आणि चार वेळेस शिवसेनेचे अर्जुन खोतकर निवडून आले. 2014 मध्ये चौरंगी लढतीत शिवसेनेचे अर्जुन खोतकर निवडून आले तरी त्यांचे मताधिक्य केवळ 296 मतांचे एवढे कमी राहिले.

2014 जालना विधानसभा निवडणूक निकाल

अर्जुन खोतकर (शिवसेना) - 45078 मतं

कैलास गोरंट्याल (काँग्रेस) - 44782 मतं

अरविंद चव्हाण (भाजप) - 37591 मतं

अब्दुल रशीद (बसपा) - 36350 मतं

जालना विधानसभा क्षेत्रात एकूण मतदार संख्या 2 लाख 90 हजार 207 एवढी आहे.

  • परतूर विधानसभा मतदारसंघ क्रमांक 99

विद्यमान आमदार - बबनराव लोणीकर (भाजप)

मुख्य लढत - भाजपचे बबनराव लोणीकर विरुद्ध काँग्रेसचे सुरेशकुमार जेथलिया

जालना जिल्ह्यातील परतूर हा विधानसभा मतदारसंघ परभणी लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. १९६२ पासून काँग्रेसचे या मतदारसंघावर वर्चस्व होते, मात्र १९९९ पासून भाजपने येथे स्वतःचे अस्तित्व निर्माण केले. महाराष्ट्राचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचे मंत्री बबनराव लोणीकर हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. परतूर-मंठा विधानसभा मतदारसंघातून बबनराव लोणीकर हे १९९९, २००४ आणि २०१४ असे तीन वेळा निवडून आलेले आहेत.

मतदारांची संख्या

पुरुष – १,४१,४८२
महिला – १,२६,०६७
एकूण मतदान – २,६७,५४९

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) बबन लोणीकर, भाजप – ४६,७६६
२) सुरेशकुमार जेथलिया, काँग्रेस – ४२,४६६
३) बाबासाहेब आकात, मनसे – ३७,३३५
४) निवास चव्हाण, अपक्ष – २४,३७१
५) सोमनाथ साखरे, शिवसेना – १८,९१२

  • घनसावंगी विधासभा मतदारसंघ

विद्यमान आमदार - राजेश टोपे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)

मुख्य लढत - राष्ट्रवादीचे राजेश टोपे विरुद्ध शिवसेनेचे डॉ. हिकमत उढाण

जालना जिल्ह्याचे नेते राजेश टोपे यांचा हा मतदारसंघ. हा मतदारसंघ जालना जिल्ह्यात असला तरी लोकसभेसाठी तो परभणी लोकसभेच्या अंतर्गत येतो. घनसावंगी हा टोपेंचा बालेकिल्ला आहे. पण येथे शिवसेनेची तयारी कौतुकास्पद आहे. 1999 पासून ते आजवर सलग विजय मिळवत राजेश टोपे निवडून आलेले आहेत. टोपे घनसावंगीमध्ये सलग तीन वेळेस विजयी झालेले आहेत. या मतदार संघात 2014 च्या निवडणुकीत राजेश टोपे यांच्या विरोधात शिवसेनेकडून डॉ. हिकमत उढाण यांना ऐनवेळी उमेदवारी देण्यात आली. तर भाजपकडून माजी आमदार विलास खरात यांना उमेदवारी देण्यात आली. 2014 च्या तिहेरी लढतीत भाजप शिवसेनेच्या मतविभाजनाचा फायदा घेत राजेश टोपेंचा पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने विजय झाला. यंदा मात्र, युतीकडून शिवसेनेचे डॉ. हिकमत उढाण​​​​​​​ यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

2014 घनसावंगी विधानसभा उमेदवार आणि मते

राजेश टोपे (राष्ट्रवादी) : 98030
विलास खरात(भाजप) : 54554
डॉ. हिकमत उढाण (शिवसेना) : 45657

  • बदनापूर विधानसभा मतदारसंघ

मुख्य लढत विद्यमान आमदार - नारायण कुचे (भाजप)

मुख्य लढत - भाजपचे नारायण कुचे विरुद्ध राष्ट्रवादीचे बबलू चौधरी, मनसेचे भोसले

2014 च्या विधासभा निवडणूक उमेदवारांना मिळालेली मते

नारायण कुचे (भाजप) - 73,560

बबलू चौधरी (राष्ट्रवादी) - 50,065

संतोष सांबरे (शिवसेना) - 30,945

  • भोकरदन विधानसभा मतदारसंघ, लक्ष्यवेधी मतदारसंघ

विद्यमान आमदार - संतोष दानवे (भाजप)

मुख्य लढत - भाजपचे संतोष दानवे विरुद्ध राष्ट्रवादीचे चंद्रकांत दानवे

एकुण मतदार संख्या: 3 लाख 1 हजार 846

2014 मध्ये भोकरदन विधासभा मतदारसंघात रावसाहेब दानवे यांनी आपल्या मुलगा संतोष दानवे यांना विधासभेच्या आखाड्यात उतरवण्याचा निर्णय घेतला. यावेळी खासदार रावसाहेव दानवे यांचे पुत्र संतोष दानवे विरुद्ध राष्ट्रवादीचे चंद्रकांत दानवे असा सामना रंगला. या लढतीत भाजपचे उमेदवार संतोष दानवे यांचा 6 हजार 750 मतांनी विजय झाला. यावेळी विधानसभेचा गड आपल्याकडे खेचण्यात दानवे पिता पुत्राला यश आले. यंदा भोकरदन येथे भाजपा शिवसेना महायुतीचे उमेदवार आमदार संतोष दानवे, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीचे उमेदवार माजी आमदार चंद्रकांत दानवे व वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दिपक बोराडे यांच्यात मुख्य लढत आहे.

भोकरदन विधानसभा मतदारसंघातील मतदारसंख्या

महिला मतदार संख्या: 1 लाख 42 हजार 961

पुरुष मतदार संख्या: 1 लाख 58 हजार 885

2014 विधानसभा- उमेदवारांना मिळालेली मते

संतोष दानवे (भाजप) -69,597

चंद्रकांत दानवे (राष्ट्रवादी) 62,847

रमेश गव्हाड (शिवसेना)--36,298

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.