ETV Bharat / state

घनसावंगी : भैय्या-दादाच्या राजकारणात धनुभाऊची उडी! - hikmat uddhan

जिल्ह्यातील घनसांगी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार राजेश टोपे आणि शिवसेनेचे उपनेते हिकमत उढाण या दोघांमध्येच खरी लढत होणार आहे. दोघांकडूनही आरोप-प्रत्यारोप सुरूच असतात. या दोघांमधील वाद जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेचा विषय बनतो.

जालना
author img

By

Published : Sep 23, 2019, 10:06 AM IST

Updated : Sep 23, 2019, 2:42 PM IST

जालना - जिल्ह्यातील घनसावंगी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार राजेश टोपे आणि शिवसेनेचे उपनेते हिकमत उढाण या दोघांमध्येच खरी लढत होणार आहे. दोघांकडूनही आरोप-प्रत्यारोप सुरूच असतात. या दोघांमधील वाद जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेचा विषय बनतो. दोन दिवसापूर्वी येऊन गेलेल्या विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीदेखील या भांडणात उडी मारली आहे. त्यामुळे आता राजकारण तापायला सुरुवात झाली आहे.

हेही वाचा - पवारांच्या 'हट्टा'पोटी काँग्रेसची वाताहात?

दोन दिवसापूर्वी जालन्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. जिल्ह्यामध्ये पाच आमदारांपैकी राजेश टोपे हे एकमेव राष्ट्रवादीचे घनसांवगी मतदारसंघाचे आमदार आहेत. असे असतानाही जालन्यात राष्ट्रवादीने मेळावा का घेतला हे अनेकांना पडलेले कोडे आहे. या मेळाव्यात प्रतिस्पर्धी हिकमत उढाण यांच्यावर आमदार टोपे आणि धनंजय मुंडे यांनी टीका करत आरोप केले.

हेही वाचा - 'सैरा' चित्रपटातील तम्मन्नाची खास झलक, शेअर केला व्हिडिओ

धनंजय मुंडे म्हणाले की, झोपडपट्टी पुनर्विकासमध्ये बायकोच्या नावावर दोन फ्लॅट घेऊन तिथे पैसा कमवला आणि येथे येऊन राजकारण करायचे. त्याचसोबत आमदारकीचे स्वप्न बघणाऱ्या तसेच तुमचा प्रतिनिधी होण्याचा प्रयत्न करत असलेल्या उढाणांचे 'उडान' भरण्याअगोदरच पंख छाटले पाहिजेत आणि ते या मतदारांनी करावे.

आमदार राजेश टोपे म्हणाले की, नवखे उमेदवार राजकारणात येत आहेत. भोकरदन आणि अंबड हे त्याचे उदाहरण आहे. ज्यांना बोलता येत नाही, अधिकाऱ्यांसोबत काय बोलावे ते कळत नाही, असे लोक आमदार झाले आहेत. त्यातच आता आठवड्यातून दोन दिवस मुंबई येथून येऊन आपल्या मतदारसंघातल्या अडचणी सोडवण्यासाठी काही लोक प्रयत्नशील आहेत. मुंबईत स्वतःचा व्यवसाय सांभाळत राजकारण केले जात आहे. लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी येथे तळ ठोकून बसावे लागते. मुंबईत बसून चालत नाही. त्यामुळे मुंबईचे हे पार्सल कायमचं मुंबईला पाठवून द्या, अशी उपरोधिक टीकाही त्यांनी केली.

दरम्यान, या दोन्ही आरोपांना शिवसेनेचे उपनेते हिकमत उढाण यांनी शांतपणे उत्तर दिले. ते म्हणाले, मुंबईत घेतलेला फ्लॅट अधिकृत आहे. त्याचे चेकने पेमेंटही केले आहे. त्यामुळे त्यामध्ये गैर असे काहीही नाही. मला व्यवसायासाठी पाठबळच पाहिजे असते तर इथून निवडणूक लढवायची गरजच नाही, मी मुंबईमध्येच निवडणूक लढवून किंवा राज्यसभेचा प्रतिनिधी म्हणून निवडून गेलो असतो, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

एकंदरीत दादा- भैय्याच्या या मतदारसंघांमध्ये धनुभाऊंनी उडी मारल्यामुळे आता पुढील महिनाभर यावर आरोप-प्रत्यारोप होत राहतील यात मात्र शंका नाही.

Intro:(कृपया विजवल सेव्ह करून ठेवावेत)

जालना जिल्ह्यातील घनसांगी मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार राजेश( भैया) टोपे आणि शिवसेनेचे उपनेते हिकमत उढाण( दादा) या दोघांमध्येच राजकीय निवडणूक झाली होती ,आणि होणार देखील आहे. दोघांचेही आरोप-प्रत्यारोप अधुन मधून सुरू असतात .मात्र दोन दिवसापूर्वी येऊन गेलेल्या विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे (धनुभाऊ) यांनीदेखील या भांडणात उडी मारली आहे त्यामुळे आता राजकारण तापायला ही सुरुवात झाली आहे.

Body:दोन दिवसापूर्वी जालन्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. जिल्ह्यामध्ये पाच आमदारांपैकी राजेश टोपे हे एकमेव राष्ट्रवादीचे घनसांगी मतदार संघाचे आमदार आहेत असे. त्यांनी जालन्यात हा मेळावा का घेतला हे अनेकांना पडलेले कोडे आहे? त्याच सोबत जालन्यात मेळावा घेऊन घनसावंगी येथील शिवसेनेचे प्रतिस्पर्धी हिकमत उढाण यांच्यावर आ .टोपे आणि धनु भाऊंनी आरोप केले .
धनु भाऊ म्हणाले की," झोपडपट्टी पुनर्विकास मध्ये बायकोच्या नावावर दोन फ्लॅट घेऊन तिथे पैसा कमवला आणि इथे येऊन राजकारण करायचे ,त्याचसोबत आमदारकीचे स्वप्न बघणाऱ्या तसेच तुमचा प्रतिनिधी होण्याचा प्रयत्न करीत असलेल्या,उढाणा चे "उडान "भरण्या अगोदरच पंख छाटले पाहिजेत. आणि ते या मतदारांनी करावे "
आ. राजेश टोपे म्हणाले की" नवखे उमेदवार राजकारणात येत आहेत .भोकरदन आणि अंबड हे त्याचे उदाहरण आहे. ज्यांना बोलता येत नाही ,अधिकाऱ्या सोबत काय बोलावे ते कळत नाही असे लोक आमदार झाले आहेत .त्यातच आता आठवड्यातून दोन दिवस मुंबई येथून येऊन आपल्या मतदारसंघातल्या अडचणी सोडवण्यासाठी काही लोक प्रयत्नशील आहेत, मुंबईत स्वतःचा व्यवसाय सांभाळत ,व्यवसायाला पाठवला म्हणून राजकारण केल्या जात आहे .लोकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी येथे तळ ठोकून बसावे लागते. मुंबईत बसून चालत नाही .त्यामुळे मुंबईचे हे पार्सल कायमचं मुंबईला पाठवून द्या! अशी उपरोधिक टीकाही त्यांनी केली.
दरम्यान या दोन्ही आरोपांनाशिवसेनेचे उपनेते हिकमत उढाण यांनी शांतपणे उत्तर दिले. ते म्हणाले" मुंबईत घेतलेला फ्लॅट अधिकृत आहे ,त्याचे चेकने पेमेंट ही केले आहे .त्यामुळे त्यामध्ये गैर असे काहीही नाही ."असे म्हणत आमदार टोपे यांनी केलेल्या आरोपावर ते म्हणाले की ,मला व्यवसायासाठी पाठबळच पाहिजे असते तर इथून निवडणूक लढवायची गरजच नाही ,मी मुंबईमध्येच निवडणूक लढवून किंवा राज्यसभेचा प्रतिनिधी म्हणून निवडून गेलो असतो .
एकंदरीत दादा भैय्याच्या या मतदारसंघांमध्ये धनु भाऊंनी उडी मारल्यामुळे आता पुढील महिनाभर यावर आरोप-प्रत्यारोप होत राहतील यात मात्र शंका नाही.

Conclusion:
Last Updated : Sep 23, 2019, 2:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.