ETV Bharat / state

जालना : ग्रामीण भागात दूषित पाणी पुरवठ्याचे प्रमाण वाढले; नागरिकांचे आरोग्य धोक्यात - परतूर तालुक्यात दूषित पाणीपुरवठा

जिल्ह्यात सर्वात जास्त दूषित पाणीपुरवठा अंबड आणि परतूर तालुक्यात होत आहे. मागील महिन्यात 914 पैकी 187 ठिकाणचा पाणीपुरवठा दूषित आढळला आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गट विकास अधिकारी आणि जिल्हा परिषदेकडे यासंदर्भात तक्रार करूनही कुठल्याही उपाययोजना केल्या गेल्या नाहीत.

ग्रामीण भागात दूषित पाणीपुरवठ्याचे प्रमाण वाढले
author img

By

Published : Sep 18, 2019, 7:25 PM IST

जालना - जिल्ह्यात ग्रामीण भागात दूषित पाणीपुरवठा होण्याचे प्रमाण वाढले आहे. ऑगस्टमध्ये हे प्रमाण वीस टक्के होते. जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त दूषित पाणीपुरवठा अंबड आणि परतूर तालुक्यात होत आहे. मागील महिन्यात 914 पैकी 187 ठिकाणचा पाणीपुरवठा दूषित आढळला आहे.

जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. खतगावकर

अंबड तालुक्यातील रुई गावाला गेल्या चार महिन्यांपासून सतत दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गट विकास अधिकारी आणि जिल्हा परिषदेकडे यासंदर्भात तक्रार करूनही कुठल्याही उपाययोजना केल्या गेल्या नाहीत. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन सरपंच आणि ग्रामसेवकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. गावामतील ग्रामपंचायत कार्यालय, मारुती मंदिराच्या परीसर आणि बस स्थानक येथील पुरवठा केलेल्या पाण्याचे नमुने घेऊन ते तपासले असता, दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे पंचायत समिती कर्मचारी एस. एस. जाधव यांनी 28 ऑगस्टला केलेल्या पंचनाम्यात दिसून आले होते. असे असतानाही कुठलीही कारवाई झाली नाही.

हेही वाचा - आमदाराचं दत्तक गाव-पाण्यासाठी धावाधाव, खोतकरांच्या नंदापूरमध्ये ४ रुपयाला हंडा

या संदर्भात जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. खतगावकर यांना विचारले असता. त्यांनी यासाठी ग्रामपंचयत स्तरावरील आरोग्य जल संरक्षक आणि ग्रामसेवक जबाबदार असल्याचे स्पष्ट केले आहे. अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाईल असेही ते म्हणाले.

Intro:चार महिन्यांपासून दूषित पाणीपुरवठा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी झटकले हात

जालना
जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात दूषित पाणीपुरवठा होण्याचे वाढले आहे माहे. ऑगस्ट मध्ये हे प्रमाण वीस टक्के होते. जिल्ह्यामध्येसर्वात जास्त दूषित पाणीपुरवठा अंबड आणि परतूर तालुक्यात होत आहे .मागील महिन्यात 914 पैकी 187 ठिकाणचा पाणी पुरवठा दूषित आढळला आहे.अंबड तालुक्यातील मौजे रुई या गावाला चार महिन्यांपासून सतत दूषित पाणीपुरवठा होत आहे.त्यामुळे तेथील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.या संदर्भात आंबडचे चे गट विकास अधिकारी, जिल्हा परिषदेकडे यासंदर्भात तक्रार करूनही काही उपयोग झाला नाही,पाण्यातही फरक पडला नाही,किंवा औषधीचाही वापर केल्या गेल्या नाही त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन सरपंच आणि ग्रामसेवकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या दूषित पाण्यासंदर्भात अंबड पंचायत समिती विभागाने पंचनामे देखील केलेले आहेत .त्यामध्ये ही दूषित पाणीआढळलेले आहे. दिनांक 28 ऑगस्ट रोजी झालेल्या पंचनाम्यात देखील गावामधील ग्रामपंचायत कार्यालय, मारुती मंदिराच्या मागे, बस स्टँड जवळ, आणि बस स्थानक येथील नागरिकांना पुरवठा केलेल्या पाण्याचे नमुने घेऊन ते तपासले असता दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा एस. एस. जाधव या पंचायत समिती कर्मचाऱ्याने पंचनामा केला आहे. असे असताना देखील काहीच कारवाई झाली नाही. त्यामुळे गावात साथीचे रोग पसरण्याचीशक्यता आहे.
या संदर्भात जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर खतगावकर यांना विचारले असता त्यांनी ही याची जबाबदारी ग्रामपंचयत स्तरावर आरोग्य जल संरक्षक आणि ग्रामपंचायत च्या ग्रामसेवकाची आहे त्यांचे .अहवाल आल्या नंतरकारवाई करू असे सांगितले.Body:सोबत बाईट,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.खतगावकरConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.