जालना- दिवाळीसाठी आलेल्या एका मित्राने आपल्या मित्रावर चाकू हल्ला केला आहे. ही घटना काल रात्री नऊच्या सुमारास जुन्या जालन्यातील बरोबर गल्ली भागात घडली. लखन हिराला मदारे आणि राहुल हिरालाल पारे (वय २०) असे जखमी तरुणांची नावे आहेत.
लखन मदारे याच्यावर त्याच्या एका मित्राने जुन्या वादातून चाकू हल्ला केला. या दरम्यान लखन याला वाचवण्यासाठी पुढे आलेल्या राहुल पारेवरही लखनच्या मित्राने चाकू हल्ला केला. त्यामुळे, लखन याच्याबरोबर त्याचा मित्र राहुल हा देखील जखमी झाला.
या घटनेनंतर दोघाही गंभीर जखमींना उपचारार्थ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.
हेही वाचा- दिवाळीत गरिबांच्या तोंडावर उमटले हास्य... छत्रपती सेनेचा उपक्रम