ETV Bharat / state

किराणा दुकान व पिठाच्या गिरणीतून अवैध देशी दारू विक्री - बदनापूर अवैध देशी दारू विक्री

बदनापूर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील खामगाव येथील किराणा दुकानात आणि पिठाच्या गिरणीतून अवैधरीत्या देशी दारूची विक्री होत असल्याची घटना बदनापूर पोलिसांनी उघडकीस आणली आहे.

अवैध देशी दारू विक्री
अवैध देशी दारू विक्री
author img

By

Published : Jun 20, 2020, 2:09 PM IST

जालना - बदनापूर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील खामगाव येथील किराणा दुकानात आणि पिठाच्या गिरणीतून अवैधरीत्या देशी दारूची विक्री होत असल्याची घटना बदनापूर पोलिसांनी उघडकीस आणली आहे. देशी दारू विक्री करणाऱ्या एकाला अटक करण्यात आली असून एक जण फरार आहे.

तालुक्यातील मौजे खामगाव येथील बसस्टँडजवळ असलेल्या उदय किराणा दुकानातून अवैध दारू विक्री करत असल्याची माहिती खबऱ्यामार्फत पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांनी मिळाली होती. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक खेडकर, खरात, चरनसिंग बमनावत व गजानन भवरे यांनी 19 जूनला सायंकाळी साडेसहाच्या सुमारास किराणा दुकानावर छापा टाकला. त्यावेळी बजरंग मरदानसिंग खोकड हा किराणा दुकानातून देशी दारूची विक्री करत असल्याचे दिसले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन दुकानाची झडती घेतली असता दुकानातून देशी दारूच्या 58 बाटल्या आढळल्या.

किराणा दुकानाच्या पाठीमागे असलेल्या पिठाच्या गिरणीतून सुरेश हिरालाल निम्रट दारूविक्री करत असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली होती. तेव्हा लगेचच पोलिसांनी पिठाच्या गिरणीतील रूमवरही छापा टाकला. या ठिकाणी तपासणी केली असता 102 दारूच्या बाटल्या सापडल्या. मात्र, सुरेश निम्रट पळून गेला.

एकाच गावात दोन ठिकाणी देशी दारूच्या साठयावर बदनापूर पोलिसांनी छापा मारून जवळपास 10 हजार रुपये किंमतीच्या देशी दारूच्या 160 बाटल्या जप्त केल्या. बजरंग खोकड याला ताब्यात घेण्यात आले आहे. कोरोना उपायायेजना नियमानुसार प्रतिबंधित आदेश तोडणे व दारूची अवैध चोरटी विक्री करणेबाबत हवालदार गजानन भवरे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.