ETV Bharat / state

मुरमाच्या मनमानी उपशामुळे घाणेवाडी जलाशयाला धोका - dam

समृद्धी महामार्गाच्या मजबुतीकरणासाठी घाणेवाडी जलाशयातून हजारो ब्रास मुरूम उपसला जात आहे. त्यामुळे या तलावात पंधरा ते वीस फूट खोल खड्डे तयार झाले आहेत. यामुळे घाणेवाडी जलाशयाचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

मुरमाच्या मनमानी उपशामुळे घाणेवाडी जलाशयाला धोका
author img

By

Published : Jun 30, 2019, 3:05 PM IST

जालना - समृद्धी महामार्गाच्या मजबुतीकरणासाठी घाणेवाडी जलाशयातून हजारो ब्रास मुरूम उपसला जात आहे. त्यामुळे या तलावात पंधरा ते वीस फूट खोल खड्डे तयार झाले आहेत. यामुळे घाणेवाडी जलाशयाचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

मुरमाच्या मनमानी उपशामुळे घाणेवाडी जलाशयाला धोका

शुक्रवार दिनांक 28 ला जलतज्ञ, समृद्धी महामार्गाचे अधिकारी आणि घाणेवाडी जलसंरक्षण मंचच्या पदाधिकाऱ्यांनी या जलाशयाची संयुक्त पाहणी केली. यावेळी तलावाच्या भिंती पासून एकदम वरच्या तोंडाला हे खड्डे खोदल्यामुळे वरून वाहत येणारे पाणी तलावापर्यंत पोहोचणार नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

या तलावाच्या दोन्ही बाजूला सांडवे आहेत. जेणेकरून तलाव पूर्ण भरल्यानंतर जास्तीचे पाणी दोन्ही बाजूने वाहून जाईल. सांडव्याच्या जवळच मुरूम उपसा केल्यामुळे पाण्याच्या दबाव सांडव्याच्या भिंतीवर येऊन या भिंती वाहून जाण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. जर असे झाले तर तलावांमध्ये एक थेंबही पाणी शिल्लक राहणार नाही, अशी माहिती आधिकाऱ्यांनी दिली आहे.

समृद्धी महामार्गाचे अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत असून नगरपालिकेनेच एनओसी दिली असल्याचे सांगत आहेत. मात्र प्रत्यक्षात मात्र नगरपालिकेने वरिष्ठ प्रशासनाच्या आलेल्या पत्रामुळे मुरूम उपसण्यास ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. परंतु हा मुरूम कुठून उपसायचा किती उपसायचा याविषयीचे मार्गदर्शन गौण खनिज अधिकाऱ्यांनी करायला हवे. मात्र तसे न होता, समृद्धी महामार्ग विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ज्याला जसा सोयीस्कर पडेल तसा मुरूम उपसण्याचा सपाटा लावला आहे.

Intro:जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घाणेवाडी जलाशयातून मनमानी आणि हवा तेवढा मुरमाचा समृद्धी महामार्गासाठी उपसा होत असल्यामुळे घाणेवाडी जलाशयाचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

Body:नागपूर -मुंबई हा समृद्धी महामार्ग जालना शहरातून जातो या रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी मुरमाची प्रचंड आवश्यकता आहे. आणि हा मुरूम मिळेल तिथे, मिळेल तसा उपसण्याचे काम संबंधित यंत्रणा करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून या यंत्रणेने घाणेवाडी जलाशयातून हजारो ब्रास मुरूम उपसला आहे. त्यामुळे या तलावात पंधरा ते वीस फूट खोल खड्डे तयार झाले आहेत. हे खड्डे खरेतर पाणी साचण्यास साठी चांगले आहेत ,त्याची जागा चुकली असल्याचे मत जलतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे . काल शुक्रवार दिनांक 28 रोजी जलतज्ञ, समृद्धी महामार्गाचे अधिकारी आणि घाणेवाडी जलसंरक्षण मंचच्या पदाधिकाऱ्यांनी या जलाशयाची संयुक्त पाहणी केली, तलावाच्या भिंती पासून एकदम वरच्या तोंडाला हे खड्डे खोदल्यामुळे वरून वाहत येणारे पाणी तलावापर्यंत पोहोचणार नाही, आणि पर्यायाने तलावतच जर पाणी नसेल तर हे पाणी जालन्यापर्यंत पोहोचू शकत नाही. तसेच या तलावाच्या दोन्ही बाजूला सांडवे आहेत जेणेकरून तलाव पूर्ण भरल्यानंतर जास्तीचे पाणी दोन्ही बाजूने वाहून जाईल. आणि तलाव सुरक्षित राहील मात्र या यंत्रणेने दोन्ही बाजूला सांडव्याच्या जवळच मुरूम उपसा केल्यामुळे पाण्याचं दबाव सांडव्याच्या भिंतीवर येऊन या भिंती वाहून जाण्याची भीती वर्तविण्यात येत आहे .आणि जर असे झाले तर तलावांमध्ये एक थेंबही पाणी शिल्लक राहणार नाही पर्यायाने पाऊस काळ जरी चांगला झाला तरीदेखील तलावांमधून बेसुमार ,मनमानी पद्धतीने होणाऱ्या या मुरूमच्या उपश्यामुळे जालनेकरांना पुन्हा पाण्यापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. समृद्धी महामार्गाचे अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत, आणि नगरपालिकेनेच एनओसी दिली असल्याचे सांगत आहेत .परंतु प्रत्यक्षात मात्र नगरपालिकेने वरिष्ठ प्रशासनाच्या आलेल्या पत्रामुळे मुरूम उपसण्यास ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे .परंतु हा मुरूम कुठून उपसायचा किती उपसायचा याविषयीचे मार्गदर्शन गौण खनिज अधिकाऱ्यांनी करायला हवे ,मात्र तसे न होता समृद्धी महामार्ग विभागाचे कर्मचारी ज्याला जसा सोयीस्कर पडेल तसा मुरूम उपसण्याचा सपाटा लावत आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.