ETV Bharat / state

'त्या' पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करा.. भाजप कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी गवळी समाज आक्रमक - जालन्यात पोलिसांकडून तरुणाला मारहाण

दीपक हॉस्पिटलमध्ये काही तरुणांनी तोडफोड केली होती आणि याचा व्हिडिओ भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस शिवराज नारियलवाले हे काढत होते. याच दरम्यान पोलिसांचे लक्ष शिवराज यांच्यावर गेले आणि त्यांनी थेट मारहाण करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी जबर मारहाण केली होती. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गवळी समाज आता आक्रमक झाला आहे.

gawli-samaj-aggressive-
gawli-samaj-aggressive-
author img

By

Published : May 28, 2021, 3:37 PM IST

Updated : May 28, 2021, 3:57 PM IST

जालना - दीड महिन्यापूर्वी दीपक हॉस्पिटलमध्ये काही तरुणांनी तोडफोड केली होती आणि याचा व्हिडिओ भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस शिवराज नारियलवाले हे काढत होते. याच दरम्यान पोलिसांचे लक्ष शिवराज यांच्यावर गेले आणि त्यांनी थेट मारहाण करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी जबर मारहाण केली होती. याचा व्हिडिओ गुरुवारी (27 मे रोजी) व्हायरल झाल्यानंतर गवळी समाज आता आक्रमक झाला आहे. आणि मारहाण करणाऱ्या तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर, पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्यासह मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करावे, अशी मागणी करीत आहेत. या संदर्भात आज त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन दिले आहे.

भाजप कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी गवळी समाज आक्रमक
9 एप्रिल रोजी ही मारहाण झाली होती याचे पडसाद आता उठत आहे. याला कारणही तसेच आहे पोलीस उपाधीक्षक सुधीर खिरडकर हेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडल्यामुळे आता त्यांच्या काळात झालेले आणि पोलिसांनी दबाव टाकल्यामुळे अशी अनेक प्रकरणे बाहेर आली नव्हती. आता हळूहळू त्यांच्या कार्यकालात झालेली अशी प्रकरणे बाहेर यायला लागली आहेत. त्यातीलच हे एक मोठे प्रकरण आहे. जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिल्यानंतर गवळी समाजाच्या प्रतिष्ठित मंडळींनी कदीम जालना पोलीस ठाणे गाठून गवळी समाजाला अपमानित करणारी भाषा वापरून सर्व समाजालाच शिवीगाळ केल्याप्रकरणी सुधीर खिरडकर यांच्यावर गुन्हा नोंदवावा अशी मागणीही त्यांनी केली. परंतु सुधीर खिरडकर हे वरिष्ठ अधिकारी असल्यामुळे चौकशी करून मगच गुन्हा नोंदवता येईल, असा पवित्रा उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांनी घेतला. त्या संदर्भात गवळी समाजाला तक्रार देण्यासाठी सांगितले, मात्र या समाज बांधवांनी तक्रार न देता थेट गुन्हा नोंदवावा अशी मागणी केल्यामुळे यावर काही तोडगा निघाला नाही. गवळी समाजाचे लोक पोलीस ठाण्यातून बाहेर पडले.

या संदर्भातील बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा - जालन्यात हॉस्पिटलमध्ये पोलिसांची तरुणाला अमानुष मारहाण, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

आज निवेदन देण्यासाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुजित जोगस, सरचिटणीस तसा पीडित कार्यकर्ते शिवराज नारियलवाले, प्रतिष्ठित नागरिक बाबुराव सतकर, सुनील खरे, गणेशराव सुपारकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Last Updated : May 28, 2021, 3:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.