भोकरदन (जालना) - तालुक्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतंर्गत मोफत बुधवारी तांदूळ वाटप करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत हे वाटप करण्यात येत आहे. तालुक्यात आणि शहरात अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजना अंतर्गत प्रती लाभार्थी 05 किलो प्रमाणे हे धान्य धान्य वाटप करण्यात येत आहे. यावेळी भोकरदन शहरातील राशन दुकानावर जाऊन केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी पाहणी केली.
मंत्री दानवे यांनी यावेळी लाभार्थींच्या समस्या जाणून घेत त्यांची विचारपूस केली. यावेळी तहसील कार्यालयाचे कर्मचारी आणि शहरातील नागरिक उपस्थित होते.
हेही वाचा - कराड-पाटणमधील चौघांची टेस्ट 'पॉझिटिव्ह'; दहा महिन्यांच्या बाळाला लागण
हसनाबद येथे उपविभागीय अधिकारी यांची राशन दुकानाला भेट -
स्वस्त धान्य दुकान हसनाबद येथे उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी यांनी भेट दिली. लाभार्थींना नियमानुसार स्वस्थ धान्य वाटप करण्यात येत आहे का? अशी विचारपूस करून कोरोनाविषयी माहिती देऊन शासनाच्या नियमांचे पालन करावे, असे यावेळी स्वामी यांनी सांगितले. यावेळी तहसीलदार संतोष गोराड, गटशिक्षणाधिकारी शहागडकर साहेब पुरवठा अधिकारी लबडे आदी उपस्थित होते.