ETV Bharat / state

तलाठ्याने परस्पर उतरवला सहा लाखांचा बोजा; तीन जणांना अटक

author img

By

Published : Feb 14, 2021, 10:31 PM IST

कर्जापोटी चढवलेला सहा लाख 17 हजार 200 रुपयांचा बोजा तलाठ्याने परस्पर उतरवल्याप्रकरणी तलाठी, 2 कर्जदार आणि त्यांना मदत करणारा एकजण आशा चौघा जणांविरूद्ध कर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आली आहे.

जालना
जालना

जालना - शेतीशी संबंधित एका कंपनीला दिलेल्या कर्जापोटी चढवलेला सहा लाख 17 हजार 200 रुपयांचा बोजा तलाठ्याने परस्पर उतरवल्याप्रकरणी तलाठी, 2 कर्जदार आणि त्यांना मदत करणारा एकजण आशा चौघा जणांविरूद्ध कर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आली आहे.

नेटाफिम अ‌ॅग्रीकल्चर फायनान्स इं. एजन्सी प्रायव्हेट लिमिटेड ही संस्था शेतीविषयक कामांसाठी कर्ज देते. त्यानुसार या संस्थेने 25 डिसेंबर 2017 ला जालना तालुक्यातील वडगाव येथे राहणाऱ्या एकनाथ सवाईराम राठोड, काळुबाई सवाईराम राठोड, यांना शेती विकास कामासाठी सहा लाख 17 हजार 200 रुपयांचे कर्ज मंजूर केले होते . त्याबदल्यात कर्जदारांनी कर्ज न भरल्यास कंपनीने त्यांची पत्रा तांडा शिवारातील गट क्रमांक 66 मधील 50 आर व गट क्रमांक 67 मधील 60 आर व 71 आर जमीन नोंदणीकृत गहाणखत करून घेतली होती. सदर कर्जाचा बोजा गाव नमुना सातबारावर चढविण्यात आला होता. त्यानंतर यांची वसुली सुरू असताना सातबारावर चढवलेला बोजा उतरविण्यात आल्याचे लक्षात आले.

ऑक्टोबर 2020 पूर्वीच हा बोजा उतरवला

कंपनीचे वसुली अधिकारी मनोज डहाके, सहायक विधी व्यवस्थापक सोमनाथ ढोले, यांनी या प्रकरणाची चौकशी केली. त्यावेळी ऑक्टोबर 2020 पूर्वीच हा बोजा उतरविण्यात आल्याचे लक्षात आले. एकनाथ राठोड काळुबाई राठोड या दोघांनी त्यांचा भाऊ ज्ञानेश्वर मोतीराम पवार राहणार, वडगाव तालुका जालना, यांच्या मदतीने त्यांच्या घरी नेटाफिम अ‌ॅग्रीकल्चर फायनान्स एजन्सी प्रायव्हेट लिमिटेड यांच्या नावाने खोटे बनावट शिक्के तयार करून आणि संगणकाच्या मदतीने कंपनीच्या नावाचे खोटे दस्तावेज तयार केले. ते ना हरकत प्रमाणपत्र तलाठी एम.जी. सोनवणे यांना दिले आणि बोजा उतरविण्यास सांगितले. त्यानुसार तलाठ्याने देखील कंपनीला कोणतीही सूचना पत्र व्यवहार न करता गहाणखत केलेल्या जमिनीवरून सहा लाख सत्तर हजार दोनशे रुपयांचा बोजा कमी केला.

बोजा परस्पर उतरवल्याप्रकरणी कंपनीची फसवणूक

माहे ऑक्टोबर 2020 पूर्वी एकनाथ राठोड, काळुबाई राठोड ज्ञानेश्वर मोतीराम पवार यांच्या मदतीने हा बोजा कमी केला याप्रकरणी दिनांक पाच ऑक्टोबर 2020 ला चंदंजिरा पोलीस ठाण्यामध्ये तक्रारही दिली होती. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी हा गुन्हा जालना तालुक्याच्या हद्दीत घडला असल्यामुळे सदरील 4 नोव्हेंबर 2020 ला हा गुन्हा वर्ग करण्यात आला. त्यानंतर या प्रकरणाची तालुका पोलिसांनी चौकशी केली. आज दिनांक 14 फेब्रुवारी रोजी याप्रकरणी महिला काळुबाई राठोड यांना वगळता उर्वरित तिघांनाही अटक केले आहे. सहा लाख 70 हजार 200 रुपयांचे रुपयांचा बोजा परस्पर उतरवल्याप्रकरणी कंपनीची फसवणूक केल्याचा 420 चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक वडते हे करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.