जालना- सततच्या पावसामुळे काल भोकरदन तालुक्यातील गुलतरो नदीला पूर आला होता. त्यामुळे, धावडा गाव व नवीन वस्ती (समतानगर) च्या मधोमध वाहणाऱ्या गुलतरो नदीवरील पूल पाण्याखाली आला. त्यामुळे, सायंकाळच्या सुमारास अनेकांनी घरी जाण्यासाठी पुलावर दोरीच्या सहायाने आपली वाट काढत जीवघेणा प्रवास केला.
मंगळवारी (२२ सप्टेंबर) रात्री याच पुलावरून एक युवक दुचाकीसह वाहून गेला होता. मात्र, सुदैवाने बाभळीच्या झाडाची फांदी हाती लागल्याने त्याला स्वत:चे प्राण वाचवता आले. या भागात काल दुपारी दमदार पाऊस झाला होता. त्यामुळे, नदीच्या पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे सायंकाळच्या सुमारास अनेकांना पुलावरून जीवघेणा प्रवास करावा लागला. पुन्हा जीव मुठीत धरून प्रवास करावा लागू नये म्हणून पुलाची उंची वाढवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
हेही वाचा- जिल्ह्यातील पाणी प्रकल्पांची परिस्थिती भक्कम; पाण्याची चिंता मिटली