ETV Bharat / state

जिल्ह्यात पेरणीला सुरुवात; मात्र खताचा तुटवडा होण्याची शक्यता

author img

By

Published : Jul 1, 2019, 9:52 PM IST

जिल्ह्यामध्ये पावसाळ्याला हळूहळू सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनीही पेरणीला सुरुवात केली आहे. मात्र, यावर्षी खताचा तुटवडा होण्याची शक्यता, खत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.

जालना रेल्वे स्थानकावर मालगाडीत आलेल्या खतांची पोते

जालना- जिल्ह्यामध्ये पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनीही खरीप हंगामाच्या पेरणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे पिकांसाठी लागणाऱ्या खतांची आवकही सध्या सुरू झाली आहे. जालना रेल्वे स्थानकावर मालगाडीच्या माध्यमातून हा खत येत आहे. मात्र, यावर्षी खताचा तुटवडा होण्याची शक्यता, खत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.

जालना रेल्वे स्थानकावर मालगाडीत आलेल्या खतांची पोते उतरवितांना मजदूर

जालना रेल्वे स्थानकावर मागील महिन्यामध्ये दोन मालगाडया आल्या होत्या. यामध्ये सम्राट कंपनीचा डीएपी खत ३११० टन आणि २० -२०- ०-१३ या नावाचे १ हजार ८५० टन खत आला आहे. लवकरच १००० टन युरिया आणि १६०० टन १० -१०- २६ हा खत येणार आहे. सद्या परिस्थितीमध्ये युरियाला जास्त मागणी असल्यामुळे आणि पुरवठा कमी होत असल्यामुळे बाजारामध्ये या खताची टंचाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्यारा दीप कंपनीचा खत हा ओरिसा येथून तर झूआरी कंपनीचा खत गोवा येथून आला आहे. जिल्ह्यामध्ये ठोक विक्रेत्यांना या खताचे वाटप सुरू असून उर्वरित खत संबंधीत कंपनीच्या गोदामांमध्ये ठेवला जाणार आहे. त्यामुळे या खतांसाठी शेतकऱ्यांची मागणी होताच त्यांना पुरवठा करणे सोपे होणार आहे.

दरम्यान मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी खत कंपन्यांसाठी अडचणीची वेळ आहे. कारण मागील वर्षी शेतकऱ्यांनी पेरणीचे नियोजन मे महिण्यातच केले होते. आणि त्यानूसार जूनमध्ये पेरण्या सुरू केल्या होत्या. परंतु यावर्षी शासनाने जून महिन्यापर्यंत बियाणे विक्रीस बंदी घातली होती. पर्यायाने पेरण्या पुढे ढकल्यागेल्या. यामुळे खत कंपनीलाही नियोजन करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. परिणामी, यावर्षी खताचा तुटवडा होण्याची शक्यता कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.

Intro:जिल्ह्यामध्ये पावसाळ्याला हळूहळू सुरुवात झाले आहे. तसेच ेतकर्‍यांनी पेरणी ला ही सुरुवात केली आहे .त्यामुळे पुढील या पिकांसाठी लागणाऱ्या खताची आवक सुरूझालीआहे .जालना रेल्वे स्थानकावर मालगाडीच्या माध्यमातून हा खत येत आहे.

Body:जालना रेल्वे स्थानकावर मागील महिन्यामध्ये दोन मालगाडया आल्या .यामध्ये सम्राट कंपनीचा डीएपी या नावाने 3110 टन आणि 20 -20- 0-13 हा 1850 टन खत आला आहे. लवकरच एक हजार टन युरिया आणि आणि सोळाशे टन 10 -26- 26 हा खत येणार आहे .सद्य परिस्थितीमध्ये युरियाला जास्त मागणी असल्यामुळे आणि पुरवठा कमी होत असल्यामुळे बाजारामध्ये या खताची टंचाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्यारा दीप कंपनीचा खत हा ओरिसा येथून तर झूवारी कंपनीचा खत गोवा येथून आला आहे. जिल्ह्यामध्ये ठोक विक्रेत्यांना या खताचे वाटप सुरू असून उर्वरित खत संबंधित कंपनीच्या गोदामांमध्ये ठेवला जाणार आहे .जेणेकरून शेतकऱ्यांची मागणी होताच या खताचा पुरवठा करणे सोपे होणार आहे.
दरम्यान मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी खत कंपन्यांसाठी अडचणीची वेळ आहे .कारण मागील वर्षी शेतकऱ्यांनी पेरणीचे नियोजन मे मध्येच केले होते .आणि जूनमध्ये पेरण्या सुरू केल्या होत्या .परंतु यावर्षी शासनाने जून महिन्यापर्यंत बियाणे विक्रीस बंदी घातली होती. पर्यायाने पेरण्या पुढे ढकलल्यामुळे खत कंपनीलाही ही नियोजन करण्यासाठी पुरेसा वेळ मिळालेला नाही. त्यामुळे यावर्षी खताचा तुटवडा होण्याची शक्यताही कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वर्तविली.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.