ETV Bharat / state

कीटकनाशकांवर बंदी आणल्यास उत्पादन घटेल - लक्ष्मण वडले

शेतकऱ्यांचा महत्त्वाचा असलेला खरीप हंगाम तोंडावर येऊन ठेपला आहे. येत्या चार-पाच दिवसात पेरणीला सुरुवात होईल आणि महिन्याभरानंतर शेतकऱ्यांना विविध पिकांवर फवारणी करण्यासाठी कीटकनाशकांची गरज भासणार आहे. अशा महत्त्वाच्या वेळी केंद्र सरकार 27 कीटकनाशकांवर बंदी आणण्याचा प्रस्ताव तयार करीत आहे.

central govt decision pesticides ban  pesticides ban  कीटकनाशक बंदी केंद्र सरकार निर्णय  कीटकनाशक बंदी न्युज जालना  शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण वडले  कीटकनाशक बंदीबाबत लक्ष्मण वडले  जालना लेटेस्ट न्युज  jalna latest news
शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण वडले
author img

By

Published : Jun 1, 2020, 4:40 PM IST

Updated : Jun 1, 2020, 6:00 PM IST

जालना - केंद्र सरकार 27 कीटकनाशकांवर बंदी आणण्याचा प्रस्ताव तयार करीत आहे. फवारणासाठी कीटकनाशकांशिवाय पर्याय नाही. त्यामुळे या कीटकनाशकांवर बंदी आली, तर उत्पादन घटेल फक्त सेंद्रिय शेती केल्यास हवे तेवढे उत्पादन होणार नाही, असे शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा शिवसेनेचे विद्यमान उपनेते लक्ष्मण वडले यांनी दिली. सरकारने कीटकनाशकांवर बंदी आणण्यापेक्षा याला पर्याय म्हणून ज्या शेती उत्पादनाला कीटकनाशकांची फवारणी करण्याची गरज नाही अशा बीटी बियाण्यांचा शोध लावा, अशी अपेक्षाही वडले यांनी व्यक्त केली.

कीटकनाशकांवर बंदी आणल्यास उत्पादन घटेल - लक्ष्मण वडले
शेतकऱ्यांचा महत्त्वाचा असलेला खरीप हंगाम तोंडावर येऊन ठेपला आहे. येत्या चार-पाच दिवसात पेरणीला सुरुवात होईल आणि महिन्याभरानंतर शेतकऱ्यांना विविध पिकांवर फवारणी करण्यासाठी कीटकनाशकांची गरज भासणार आहे. अशा महत्त्वाच्या वेळी केंद्र सरकार 27 कीटकनाशकांवर बंदी आणण्याचा प्रस्ताव तयार करीत आहे. या कीटकनाशकांवर बंदी आली, तर उत्पादन घटेल. आपण आजही बीटी-२ या वाणापर्यंत पोहोचलो आहोत. मात्र, दुसऱ्या देशात बीटी-७ पर्यंत बियाण्यांचे वाण उपलब्ध झाले आहे. त्याचसोबत सध्या बाजारामध्ये असलेली कीटकनाशके ही शरीरासाठी अत्यंत घातक आहेत. याची फवारणी केल्यानंतर कीटक झाडावरच काय, तर या झाडांच्या मूळाजवळ ही सुमारे वीस दिवस जात नाहीत. त्यामुळे अशी कीटकनाशके घातकच आहेत, असेही त्यांनी सांगितले सरकारने कीटकनाशकांवर बंदी आणण्यापेक्षा याला पर्याय म्हणून ज्या शेती उत्पादनाला कीटकनाशकांची फवारणी करण्याची गरज नाही अशा बीटी बियाण्यांचा शोध लावा, अशी अपेक्षाही वडले यांनी व्यक्त केली.

दरम्यान, केंद्र सरकार बंदी आणत असलेल्या कीटकनाशकांची यादी बहुतांश शेतकरी आणि औषध विक्रेत्यांना माहीतच नाही. त्यामुळे कोणत्या औषधांचा पिकांना चांगला फायदा होत होता आणि कोणते औषध शरीरास अपायकारक आहे, हेच अजून स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या या निर्णयासंदर्भात विक्रेते आणि शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे.

Last Updated : Jun 1, 2020, 6:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.