जालना - केंद्र आणि राज्य सरकारने सोयाबीन, कांदा या पिकांचे भाव कमी कमी केले आहेत. दरम्यान, कांदा उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येला दोन्हीही सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत आज शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेने जालना येथे केंद्र आणि राज्य सरकार विरोधात मूठमाती आंदोलन केले आहे. जालन्यातील आनंदनगर येथे हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून दोन्हीही सरकारचा अंत्यविधी करून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा जाहीर निषेध व्यक्त केला. आंदोलनादरम्यान आंदोलकांनी दोन्हीही सरकार विरोधात घोषणाबाजी करत परीसर दणाणून सोडला.
...तर उत्पन्न घेण्यासाठी लागलेले पैसेही मिळणार नाहीत
जेव्हा भाव वाढतात तेव्हा सर्वजण ओरडत असतात मात्र भाव कमी झाल्यास कोणीच बोलण्यास तयार नसते यामुळे शेतकरी मोठया प्रमाणावर नाराज झाला आहे. गेल्या चार दिवसांत कांद्याला अत्यंत कमी भाव मिळाला असून अशीच परिस्थिती राहिली तर शेतकऱ्यांना उत्पन्न घेण्यासाठी लागलेले पैसेही मिळणार नाहीत. अशी भिती आता शेतकऱ्यांना वाटून लागली आहे.
चांगले असलेले भाव कोसळले
बहुतांश बाजार समित्यांमध्ये मागील चार ते पाच दिवसांत असलेल्या कांद्याच्या भावात आज मोठ्या प्रमाणावर घसरण बघायला मिळाली आधीच एकरामागे उत्पादन घटले त्यात चांगले असलेले भाव कोसळले आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.
हेही वाचा - वुहानमधील संसर्गाचं वार्तांकन करणाऱ्या महिला पत्रकाराला तुरुंगवास; चीन सरकारची केली होती 'पोलखोल'