जालना : समृद्धी महामार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांच्या हस्ते 11 डिसेंबरला उद्घाटन होणार आहे. यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( DCM Devendra Fadnavis ) यांनी समृद्धी महामार्गाची पाहणी केली. जालन्यातील जामवाडी येथे पाहणीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांचा ताफा येताच शेतकऱ्यांकडून काळे झेंडे दाखवण्यात ( Farmer Showed Black flags ) आले. यावेळी काळे झेंडे दाखवणार्यांना पोलिसांनी अडवत त्यांच्याकडील काळे झेंडे हिसकावण्यात आले.
वीज तोडल्याने शेतकरी आक्रमक: समृद्धी महामार्गावर गाडी चालवण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे वेळच वेळ आहे, मात्र सरकार शेतकऱ्यांची वीज कापत आहे त्याच काय? असा संतप्त सवाल स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समृद्धी महामार्गावर काळे झेंडे दाखवले. नागपूर-शिर्डी समृद्धी महामार्गाची पाहाणी करण्यासाठी निघालेल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना जालना जिल्ह्यात प्रवेश केल्यावर स्थानिक शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
राज्यपाल हटावची मागणी : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याविरोधात निषेध नोंदविण्यात आला. दरम्यान 'राज्यपाल हटाव' या मागणीसाठी असंख्य कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांची वीज तोडल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणा करण्यात आल्या. यावेळी समृद्धी महामार्गाचा परिसर घोषणांनी दुमदुमून गेला होता.