ETV Bharat / state

जिल्हा परिषद सभागृह बनले टाईमपास चे ठिकाण; अध्यक्षांचा चले जावचा नारा, तर कर्मचारी पाहतात मॅच - जालना

जिल्हा परिषदेच्या सभागृहात झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्ष गटविकास अधिकाऱ्यांना त्यांच्या कामचुकारपणाबद्दल रागवत असताना, कर्मचारी मात्र मोबाईलवर क्रिकेटची मॅच पाहण्यात गुंग होते. त्यामुळे हे सभागृह म्हणजे अधिकाऱ्यांसाठी एक टाइमपास चे ठिकाण असल्याचे पाहायला मिळाले.

तर कर्मचारी पाहतात मॅच
author img

By

Published : Jul 2, 2019, 11:57 PM IST

जालना - जिल्हा परिषदेचे सभागृह म्हणजे 'टाइमपास ठिकाण' झाले असल्याचे चित्र मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत पाहायला मिळाले. जिल्ह्यामध्ये गटविकास अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणाबद्दल त्यांना 'चले जाव'चा नारा देत, जिल्हा परिषद अध्यक्षांनी चांगलेच धारेवर धरले. यावेळी अध्यक्ष अधिकाऱ्यांना रागवत असतानाच कर्मचारी मात्र मोबाईलवर क्रिकेटची मॅच पाहण्यात गुंग असल्याचे दिसून आले.

अधिकाऱ्यांना प्रश्न विचारताना अध्यक्ष तर दुसरीकडे क्रिकेटची मॅच पाहण्यात गुंग कर्मचारी

कै. यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये मंगळवारी दुपारी दोन वाजता स्थायी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. दुपारी 3 वाजून पंचवीस मिनिटांनी ही बैठक सुरू झाली. मागील महिन्यात पाणीपुरवठा मध्ये झालेल्या हलगर्जीपणाबद्दल सर्वच बीडीओंना अध्यक्ष, उपाध्यक्ष धारेवर धरत होते. एवढेच नव्हे तर इथे टाईमपास करायला येता का? का विनाकारण वेळ घालविता? निघून जा? अशा भाषेत जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांनी गटविकास अधिकाऱ्यांना झापले. हे सुरु असतानाच कर्मचारी मात्र मोबाईलवर भारत आणि बांगलादेश दरम्यान सुरू असलेल्या क्रिकेटचा सामना पाहण्यात गुंग झाले होते.

प्राप्त माहितीनुसार मंठा येथील गट विकास अधिकारी संजय पाटील हे रजेवर असल्यामुळे त्यांचे प्रतिनिधी असलेले कर्मचारी या सभेला हजर होते. मात्र त्यांना अध्यक्ष काय बोलत आहेत याच्याशी काही देणे घेणे नव्हते. ज्यावेळी अध्यक्ष खोतकर हे गटविकास अधिकाऱ्यांना झापत होते त्याच वेळी हे कर्मचारी मॅच पाहण्यात गुंग होते. त्यामुळे हे सभागृह म्हणजे अधिकाऱ्यांसाठी एक टाइमपास चे ठिकाण असल्याचे मंगळवारी दिसून आले. तर अध्यक्षांनी या अधिकाऱ्यांना निघून जा म्हटल्यामुळे निश्चितच हे टाईमपास चे ठिकाण आहे यावर शिक्कामोर्तब झाले आहे असेच म्हणावे लागेल.

Intro:जालना जिल्हा परिषदेचे सभाग्रह म्हणजे टाइमपास ठिकाण झाले असल्याचे चित्र आज मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत पाहायला मिळाले .जिल्ह्यामध्ये गटविकास अधिकाऱ्यांनी केलेल्या कामचुकारपणा बद्दल त्यांना चले जावचा नारा देत अध्यक्ष झापत असतानाच कर्मचारी मात्र मोबाईलवर क्रिकेटची मॅच पाहण्यात गुंग होते.

Body:कै .यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये मंगळवारी दुपारी दोन वाजता स्थायी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. दुपारी 3 वाजून पंचवीस मिनिटांनी ही बैठक सुरू झाली सुरू झाल्यानंतर मागील महिन्यात पाणीपुरवठा मध्ये हे झालेल्या हायगाई बद्दल सर्वच बीडीओंना अध्यक्ष, उपाध्यक्ष धारेवर धरत होते. एवढेच नव्हे तर इथे टाईमपास करायला येता का? का विनाकारण वेळ घालविता? निघून जा ?अशा भाषेत जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांनी गटविकास अधिकाऱ्यांना झापले .हे झापत असतानाच कर्मचारी मात्र मोबाईलवर भारत आणि बांगलादेश दरम्यान सुरू असलेला क्रिकेटचा सामना पाहण्यात गुंग झाले होते.
प्राप्त माहितीनुसार मंठा येथील गट विकास अधिकारी संजय पाटील हे रजेवर असल्यामुळे त्यांचे प्रतिनिधी असलेले कर्मचारी या सभेला हजर होते. मात्र त्यांना अध्यक्ष काय तर बोलत आहेत याच्याशी काही देणे घेणे नव्हते. ज्यावेळी अध्यक्ष खोतकर हे गटविकास अधिकाऱ्यांना झापत होते त्याच वेळी हे कर्मचारी मॅच पाहण्यात गुंग होते .त्यामुळे हे सभागृह म्हणजे अधिकाऱ्यांसाठी एक टाइमपास चे ठिकाण असल्याचे आज दिसून आले ,नव्हे तर अध्यक्षांनी या अधिकाऱ्यांना निघून जा म्हटल्यामुळे निश्चितच हे टाईमपास चे ठिकाण आहे यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.