जालना : घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सय्यद माजीद, पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव, हेड कॉन्स्टेबल संदीप बेराड यांच्यासह पालीकेचे मुख्याधीकारी, अधिकारी कर्मचारी तसेच अनेक नगरसेवक घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलीसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
विहिरीमध्ये उडी मारण्याचा प्रयत्न : रात्रभरापासून ते मानसिक तणावमध्ये होते. रात्री तीन वाजता ते घरातून विहिरीमध्ये उडी घेण्यासाठी निघाले असताना बायकोने त्यांना समजावून ओढून घरात आणले. मात्र, घरात येताच त्यांनी रूममध्ये प्रवेश केला आणि आत मधून कडी लावून घेतली. त्यांची बायको बाहेरच उभी राहिली होती. त्या नंतर ही घटना घडल्याचे समजते. अनंता लांडे यांनी टोकाचे पाऊल उचलण्यामागे दबाव किंवा घरगुती प्रकरण आहे का याचे कारण नेमके अजून पर्यंत समजू शकले नाही.
४ लाखांची लाच मागणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्याला रंगेहात पकडले - बुलढाणा : सरकारी कार्यालयांना लागलेली लाचखोरीची कीड कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे. गलेगठ्ठ पगार असतानाही लाचेच्या माध्यमातून सरकारी कर्मचारी 'वरकमाई' करत असल्याचे दिसून येत आहे. भ्रष्टाचाराने गंभीर स्वरूप धारण केले आहे. तक्रारदार मोताळा तालुक्यातील बोराखेडी येथील असून तडजोडी अंती लाचेची रक्कम दोन लाख रुपयांवर आली. तक्रारदाराने सदर बाब अँटीकरप्शन ब्युरोमध्ये कळवली .
रंगेहात पकडले : बुलढाणा येथील चिखली रोडवर नागरे ठेकेदार यांच्या बंगल्यासमोर गाळा क्रमांक आठमध्ये लाच देण्याचे ठरले. लाचखोर आरोपी रामचंद्र पवार नियोजित वेळेवर पोहोचले. त्या ठिकाणी तक्रारदाराने एक लाख रुपयांची रक्कम रामचंद्र पवार यांना सुपूर्द केली. दबा धरून बसलेल्या अँटी करप्शनच्या पथक याने दुसऱ्याच क्षणाला लाचखोर ग्राम विकास अधिकारी रामचंद्र पवार यांच्यावर झडप घातली. रामचंद्र पवारला लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.
साखरेचे पोतेही मागितले : शासकीय आणि निमशासकीय कार्यालयात सामान्य नागरिकांची कामे लाच दिल्याशिवाय होत नसल्याचे प्रकार नेहमीच उघडकीस येतात. आता तर रोख रकमेसह थेट साखरेचे पोते ही मागितल्याचे समोर आले आहे. बक्कळ पगार असूनही, कर्मचारी,अधिकारी लाच मागत असल्याचे दुर्दैव आहे. मोताळा तालुक्यातील बोराखेडी ग्रामपंचायत येथे ग्राम विकास अधिकारी रामचंद्र गुलाबराव पवार यांच्याकडे एका तक्रारदाराने २००८ या वर्षातील विवाह नोंदणीच्या कागदपत्रांची माहिती मागितली होती. या संदर्भातील अर्ज देखील देण्यात आला होता.