ETV Bharat / state

जालना जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहीकांचे वाटप, टोपेंचा रुग्णवाहीका चालवतानाचा व्हिडीओ व्हायरल

author img

By

Published : Oct 4, 2021, 2:22 PM IST

जालना - राज्यात उशिरा शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शालेय शिक्षण विभागासह आरोग्य विभागाने शाळा आणि महाविद्यालयांना योग्य प्रकारच्या सूचना केल्या असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. शाळा सुरू कराव्या अशी पालकांची मागणी होती. त्यामुळे शाळा उघडल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आज आनंद असून "आता सर्व ठीक व्हावे अशी देवाकडे प्रार्थना करतो असंही टोपे यावेळी म्हणाले आहेत.

जालना जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहीकांचे वाटप,

जालना - विद्यार्थ्यांच्या हितासाठी राज्यात उशिरा शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शालेय शिक्षण विभागासह आरोग्य विभागाने शाळा आणि महाविद्यालयांना योग्य प्रकारच्या सूचना केल्या असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. शाळा सुरू कराव्या अशी पालकांची मागणी होती. त्यामुळे शाळा उघडल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आज आनंद असून "आता सर्व ठीक व्हावे अशी देवाकडे प्रार्थना करतो असंही टोपे यावेळी म्हणाले आहेत.

पत्रकारांशी बोलताना आरोग्य मंत्री राजेश टोपे

तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना तसेच उपकेंद्रांना रुग्णवाहिका वाटप करण्यात आल्या

अहमदनगर जिल्ह्यातील 61 गावात करोना रुग्णांची संख्या वाढल्याने त्या ठिकाणी लॉकडाउन करण्यात आला असून, तेथील जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला कोरोना चाचण्या आणि लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहितीही टोपे यांनी दिली आहे. आज टोपे यांच्या हस्ते जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना तसेच उपकेंद्रांना रुग्णवाहिका वाटप करण्यात आल्या. जालना जिल्हा परिषद कार्यालयाच्या आवारात हा कार्यक्रम पार पडला त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान, टोपे यांनी स्वतः यावेळी रुग्णवाहिका चालवली. त्यावेळी उपस्थितांचे टोपे यांनी लक्ष वेधून घेतले.

हेही वाचा - 'उत्तर प्रदेशात भारतीय जनता पार्टीचे तालिबानी राज'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.