ETV Bharat / state

कोरोनामुळे रामनवमीच्या उत्साहावर विरजण; राम जन्मला,आम्ही नाही पाहिला, भाविकांच्या प्रतिक्रिया

जालन्यातील आनंदवाडी श्रीराम संस्थान इथे यावर्षी मंदिर स्थापनेचा 125 वा आनंदोत्सव साजरा करणार होते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे हे मंदिर देखील 22 तारखेपासून भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे श्रीराम जन्मोत्सवाचा सोहळा देखील इथे झाला नाही आणि भाविकांच्या आनंदावर विरजण पडले आहे.

author img

By

Published : Apr 3, 2020, 12:18 PM IST

राम जन्मला, आम्ही नाही पाहिला
राम जन्मला, आम्ही नाही पाहिला

जालना - सामाजिक ऐक्याचे प्रतीक असलेला श्रीराम जन्मोत्सव हा आता सर्वच धर्मीयांचाही उत्सव होत आहे. या उत्सवामुळे अनेक व्यवसायिकांना आणि हातावर पोट भरणाऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळते. तसेच यावेळी जत्राही भरत असल्यामुळे अबालवृद्धांना या जत्रेतून आनंदही लुटता येतो. त्यामुळे या जन्मोत्सवाची सर्वजण आतुरतेने वाट पाहतत्. मात्र, यावर्षी कोरोना महामारीने घातलेल्या थैमानामुळे जानकरांचा हिरमोड झाला असून 'राम जन्मला, आम्ही नाही पाहिला' अशी प्रतिक्रिया नागरिक देत आहेत.

जालना शहरातील आनंदवाडी श्रीराम संस्थान इथे यावर्षी मंदिर स्थापनेचा 125 वा आनंदोत्सव साजरा करणार होते. त्यानिमित्त गेल्या सहा महिन्यांपासून तयारीही सुरू होती. मात्र, कोरोना या आजाराच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे हे मंदिर देखील 22 तारखेपासून भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे श्रीराम जन्मोत्सवाचा सोहळा देखील इथे झाला नाही आणि भाविकांच्या आनंदावर विरजण पडले आहे.

या मंदिरात पूजापाठ करणाऱ्यां जेमतेम काहीजणांनी हा जन्मोत्सव साजरा केला असे सांगितले जात आहे. खरेतर यावर्षी मंदिर मोठ्या उत्साहात श्रीराम जन्मोत्सव साजरा करणार होते. ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी स्वतःच्या हस्ते सव्वाशे वर्षांपूर्वी या मंदिराची स्थापना केली होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन असल्याने श्रीराम जन्मोत्सवाच्या दिवशीदेखील मंदिर भाविकांविना सुने-सुने दिसत होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.