ETV Bharat / state

लाच प्रकरणी पोलीस उपाधीक्षकासह तिघांना जामीन मंजूर

लाच प्रकरणी अटकेत असलेल्या पोलीस उपाधीक्षकासह तिघांनाही न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आरोपींनी दाखल असलेल्या अट्रॉसिटी गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी 5 लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. त्यांना 2 लाख रूपये घेताना रंगेहात पकडण्यात आले होते.

jalna
जालना
author img

By

Published : May 24, 2021, 3:47 PM IST

जालना - लाच प्रकरणी न्यायालयाने आज (24 मे) पोलीस उपाधीक्षकासह तिन्ही आरोपींना जामीन दिला. शनिवारी सुनावणी झाल्यानंतर आरोपींना दोन दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली होती. दरम्यान, आरोपी पोलीस उपाधीक्षक सुधीर खिरडकर यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना सुरूवातीला जालना आणि नंतर औरंगाबाद येथे शासकीय रुग्णालयात दाखल केले होते.

सोशल मीडियावर तीव्र विरोध

दुसरीकडे, सोशल मीडियावर सुधीर खिरडकर यांच्या विरोधात वातावरण तापू लागले आहे. विविध संघटनांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कारवाईबाबतचे निवेदन दिले आहे. आज आरोपींना न्यायालयात आणत असताना संघटनांनी त्यांना काळे झेंडे दाखवण्याचीही तयारी केली होती. त्यामुळे आरोपींना न्यायालयात न आणता व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे सुनावणी घेण्यात आली. यावेळी न्यायमूर्ती खाजा यांनी तीनही आरोपींना जामीन मंजूर केला.

काय आहे प्रकरण?

जालना तालुक्यातील कडवंची येथील सुरेश दगडुबा क्षीरसागर यांनी जालना तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. यात पोलीस उपाधीक्षक सुधीर अशोक खिरडकर, पोलीस नाईक संतोष अंभोरे आणि पोलीस शिपाई विठ्ठल खारडे यांची नावे आहेत. 'आरोपींनी क्षीरसागर यांच्यावर दाखल असलेल्या अॅट्रॉसिटी गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी 5 लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती 3 लाख रुपये देण्याचे ठरले', अशी तक्रार आहे. दरम्यान, त्यापैकी 2 लाख रुपयांची लाच स्वीकारताना संतोष अंभोरेंना रंगेहात पकडले. त्यांनी दिलेल्या जबाबावरून अन्य दोघेदेखील यामध्ये सामील असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्यावरही तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

21 मे रोजी गुन्हा दाखल

तक्रारदार सुरेश क्षीरसागर यांनी दिलेल्या तक्रारीवरून 21 मे रोजी तालुका पोलीस ठाण्यात दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला. 12 वाजून 6 मिनिटांनी तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली. या तिघांनाही 22 मे रोजी न्यायालयात हजर केले. न्यायमूर्ती सूर्यवंशी यांच्या विशेष न्यायालयाने आरोपींना सोमवारपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. तर, आज त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.

आरोपीचा रक्तदाब वाढला

न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावताच सुधीर खिरडकर यांचा रक्तदाब वाढला. यानंतर त्यांना सरकारी दवाखान्यात भरती करण्यात आले. मात्र येथे आरोपींसाठी स्वतंत्र व्यवस्था नसल्यामुळे त्यांना औरंगाबाद येथे हलविण्यात आले.

दलित संघटना एकवटल्या

पोलीस उपाधीक्षक यांनीच पाच लाख रुपयांची लाच मागितली. त्यापैकी दोन लाख रुपये घेताना रंगेहात पकडले गेले. त्यामुळे पोलीस दलामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. आता सुधीर खिरडकर यांच्यावर त्रास दिल्याचा आरोप करणारे लोक पुढे येऊ लागले आहेत. त्यामध्ये दलित संघटनांचाही मोठा पुढाकार आहे. पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस अधीक्षकांकडे निवेदनचा भडीमार सुरू केला आहे.

हेही वाचा - ब्लाऊजने गळा आवळून सुनेने केला सासूचा खून, मृतदेह झाडीत फेकताना सीसीटीव्हीत कैद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.