ETV Bharat / state

पीक कर्जासाठी बँकेकडून विलंब, शेतकरी हैराण - जालना शेतकरी पीक कर्ज

भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी बँकेत अनेक वेळा आपली शेतामधील कामे सोडून चकरा माराव्या लागत आहेत. सकाळी ६ वाजता जाऊन बँकेसमोर तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. यामुळे शेतकरी राजा हैराण झाला आहे. पीक कर्ज घेण्यासाठी विलंब होत आहे.

Jalna
Jalna
author img

By

Published : Jun 30, 2021, 5:18 PM IST

Updated : Jun 30, 2021, 5:40 PM IST

भोकरदन (जालना) - भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी बँकेत अनेक वेळा आपली शेतामधील कामे सोडून चकरा माराव्या लागत आहेत. सकाळी ६ वाजता बँकेसमोर तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. यामुळे शेतकरी राजा हैराण झाला आहे. पीक कर्ज घेण्यासाठी विलंब होत आहे. त्यात भरलेला अर्ज त्रुटीमध्ये बाहेर काढला जात आहे. काही शेतकऱ्यांना ६ दिवसापासून चकरा मारूनही पीक कर्जासाठी नंबर लागत नाही. त्यामुळे सकाळी ५ ते ६ वाजताच आपली हातातील शेताची कामे सोडून बँकेसमोर नंबरची वाट पाहत तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यातही नंबर नाही लागला तर पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी नंबर लावण्यासाठी यावं लागत आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. पीक कर्जासाठी विलंब होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तत्काळ पीक कर्जा देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

पीक कर्जासाठी बँकेकडून विलंब, शेतकरी हैराण

शेतकऱ्यांना पीक कर्जाची गरज

कोरडवाहू (दुष्काळी) परिसरातील शेतीतून मिळणारे उत्पन्न शेतकऱ्यांच्या कौटुंबिक खर्चालाच पुरत नाही. त्यामुळे ऐन पेरणीच्या वेळी होणाऱ्या खर्चासाठी शेतकऱ्यांकडे पैसे शिल्लक राहत नाहीत. त्यामुळे पेरणीसाठी बी-बियाणे, खते, औषधे व मशागत यावरील खर्चासाठी पीक कर्ज घ्यावे लागते.

पैशांचा अभाव, त्यात दुबार पेरणीचे संकट

काही शेतकऱ्यांना यंदा उसनवारी करून आणि खासगी सावकाराकडून कर्ज काढून बियाणे, खते व औषधे खरेदी करून खरीप पेरणी करावी लागली. त्यातही अस्मानी संकटामुळे दुबार पेरणी करावी लागली. त्यामुळे खरीप पेरणीचा खर्च पुन्हा करावा लागला. परिणामी, याला बँकांनी उशिरा कर्ज देणे हे कारणीभूत ठरत असल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे.

6 दिवसांपासून चकरा मारूनही कर्ज नाही

'भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी बँकेत अनेक वेळा आपली शेतातील कामे सोडून चकरा माराव्या लागत आहेत. सकाळी ६ वाजता बँकेसमोर तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. यामुळे शेतकरी राजा हैराण झाला आहे. पीक कर्ज घेण्यासाठी विलंब होत आहे. त्यामध्ये भरलेला अर्ज त्रुटीमध्ये काढला जात आहे. काही शेतकऱ्यांना ६ दिवसांपासून चकरा मारूनही पीक कर्जासाठी नंबर लागत नाही. त्यामुळे सकाळी ५ ते ६ वाजता आपली हातातली शेताची कामे सोडून बँकेसमोर नंबरची वाट पाहत तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे', अशा भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा - विधानसभा अध्यक्ष पदाबाबत राज्यपालांकडून मुख्यमंत्र्यांना स्मरण पत्र

Last Updated : Jun 30, 2021, 5:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.