जालना - आल्याची आवक अचानक वाढल्याने दरामध्ये घट झाली आहे. याचा फटका सध्या शेतकऱ्यांना बसतो आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.
आल्याचे दर गडाडले
गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे आल्याचे पीक चांगले आले होते. त्यामुळे प्रति क्विंटल 9 ते 10 हजार भाव मिळाला. तसेच पावसामुळे पिकाचे वजन देखील चांगले भरत असल्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा झाला होता. मात्र यावर्षी उलट परिस्थिती आहे. अवेळी पावसामुळे पिकांची वाढ झाली नाही. तसेच जे काही थोडे फार पीक शेतकऱ्यांच्या पदरात पडले, ते देखील साठवण्यायोग्य नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आले विकण्यासाठी बाजारात गर्दी केली. त्यामुळे आवक वाढल्याने आल्याचा दर घसरला.
अतिवृष्टीचा परिणाम
अतिवृष्टीमुळे शेतात कायमस्वरूपी पाणी साचून राहिले होते .आणि याचा परिणाम आल्याच्या पिकावर झाला. जमिनीच्या खाली येणारे हे पीक जमिनीत वापसा न झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात सडून गेले. तसेच पोषक वातावरण नसल्यामुळे त्याची वाढ झाली नाही. अतिवृष्टीमुळे आल्याच्या पिकात अंदाजे 50 टक्क्यांची घट झाली आहे.
हेही वाचा - दिवाळीत चीनी लायटिंगचाच बोलबाला, देशी लायटिंगपेक्षा तीनपट विक्री
हेही वाचा - सीएमपी प्रणालीत जालना जि.प.चा बोलबाला; प्रशिक्षणासाठी आले नंदुरबारहून अधिकारी