ETV Bharat / state

जालना : कोविशिल्ड लसीचा साठा संपला; उद्या लसीकरण केंद्र बंद पडण्याची शक्यता

author img

By

Published : Apr 20, 2021, 4:57 PM IST

Updated : Apr 20, 2021, 5:05 PM IST

जालना - जिल्ह्यातील कोरोना रुग्णांना देण्यात येणाऱ्या कोविशिल्ड या लसीचा साठा संपलाआहे. पहाटेपर्यंत लस जालन्यात उपलब्ध झाली नाही तर उद्यापासून लसीकरण केंद्र बंद पडण्याची शक्यता निर्माण झाले आहे.

Covishield vaccine stocks depleted

जालन्यातील लसीकरण केंद्र बंद पडण्याची शक्यता
जालना जिल्ह्यामध्ये 102 लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. या लसीचा साठा संपला आहे आज फक्त पाच ते सहा केंद्रावरच हे लसीकरण सुरू आहे. परंतु कोव्हॅक्सिन या लसीच्या 1,100 मात्रा उपलब्ध आहेत. त्यापैकी ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि स्त्री रुग्णालयात ही लस उपलब्ध आहे. दरम्यान आरोग्य विभागाने सरकारकडे मागणी केली आहे. त्यानुसार लवकरच हा साठा उपलब्ध होईल, असा विश्वास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी व्यक्त केला आहे. तसेच सरकारचा आदेश आल्यानंतर काही वेळातच ही लस घेऊन येण्यासाठी सर्व यंत्रणा देखील सज्ज असल्याची माहिती खतगावकर यांनी दिली. जालना जिल्ह्यामध्ये आता शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये covid-19 या आजाराचे रुग्ण वाढत असल्याची आकडेवारी समोर आली आहे.

Last Updated : Apr 20, 2021, 5:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.