ETV Bharat / state

#coronavirus : लॉकडाऊनमुळे स्टील इंडस्ट्रीजचे सुमारे सव्वाशे कोटींचे नुकसान - स्टील इंडस्ट्री

जालना औद्योगिक वसाहतीमध्ये वेगवेगळ्या विभागांमध्ये वेगवेगळे कारखाने आहेत. त्यामध्ये फेज 1 मध्ये 344, फेज 2 मध्ये 117, फेज 3 मध्ये 7 आणि जुन्या औद्योगिक वसाहतीमध्ये 67 अशा एकूण 535 कारखान्यांची नोंद महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडे आहे.

जालना औद्योगिक वसाहत
लॉकडाऊनमुळे स्टील इंडस्ट्रीजचे सुमारे सव्वाशे कोटींचे नुकसान
author img

By

Published : Apr 14, 2020, 10:39 AM IST

जालना - शहरात असलेल्या औद्योगिक वसाहतीमध्ये स्टील उत्पादन करणारे सुमारे पंचवीस कारखाने आहेत. लॉकडाऊनमुळे या कारखान्यांचे सुमारे सव्वाशे कोटींचे नुकसान झाले असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी पुढील एक वर्ष लागण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. या कारखान्यांमध्ये बांधकामासाठी लागणाऱ्या लोखंडी सळयांचे उत्पादन केले जाते. त्यामुळे इथे कामगारांपासून ते अभियंत्यापर्यंत सर्वप्रकारचे कर्मचारी काम करतात.

लॉकडाऊनमुळे स्टील इंडस्ट्रीजचे सुमारे सव्वाशे कोटींचे नुकसान

जालना औद्योगिक वसाहतीमध्ये वेगवेगळ्या विभागांमध्ये वेगवेगळे कारखाने आहेत. त्यामध्ये फेज 1 मध्ये 344, फेज 2 मध्ये 117, फेज 3 मध्ये 7 आणि जुन्या औद्योगिक वसाहतीमध्ये 67 अशा एकूण 535 कारखान्यांची नोंद महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडे आहे.

हेही वाचा.... ईटीव्ही भारत विशेष: लाॅकडाऊनमध्ये आदिवासी शिक्षितांपेक्षाही समजूतदार..

जालना औद्योगिक वसाहत मध्ये सध्या सुमारे 25 कारखाने हे लोखंडी सळयांचे उत्पादन करणारे आहेत. महाराष्ट्रात 22 मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाले. मात्र, जालन्यात 21 मार्चपासूनच याची सुरुवात झाली होती. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी कोरोनाची भीषणता पहाता कारखानदारांची एक बैठक घेऊन तशा सुचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने दिनांक 21 आणि 22 मार्च रोजी हे सर्व कारखाने बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यांच्या या आदेशाला कारखानदारांनी चांगला प्रतिसाद दिला आणि औद्योगिक वसाहत बंद ठेवली. त्यामुळे 21 मार्च पासून ही औद्योगिक वसाहत आजही बंद आहे.

या ठिकाणी 25 स्टीलच्या कारखान्यांमध्ये सुरक्षा रक्षक, स्वच्छता कर्मचारी, कार्यालयीन कर्मचारी, रोजंदारीवर काम करणारे कामगार, अशा विविध प्रकारचे सुमारे वीस हजार लोक काम करतात. यापैकी या सर्वांचे मार्च महिन्याचे वेतनही दिले गेले आहे. मात्र, सद्य परिस्थितीत कारखाने बंद असले तरीही स्वच्छता कर्मचारी, सुरक्षा रक्षक, विज बिल, बँकेचे व्याज, देखभाल दुरुस्ती या सर्व घटकांवर खर्च सुरूच आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे फक्त स्टील उद्योगाचे 125 कोटींचे नुकसान झाले असल्याचा अंदाज जालना स्टील मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे अध्यक्ष घनश्यामदास गोयल यांनी वर्तवला आहे. तसेच हे नुकसान भरून काढण्यासाठी या क्षेत्राला पुढील एक वर्ष लागेल असेही ते म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.