ETV Bharat / state

जालन्यात कोरोनाबाधित रुग्णाचे रुग्णालयामधून पलायन; मात्र अपघातात मृत्यू

आज (मंगळवारी) दुपारीच्या सुमारास हा व्यक्ती दवाखान्यातून बाहेर निघाला आणि मोटरसायकल घेऊन जालन्याहून औरंगाबादकडे जात होता, याच वेळी औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या त्रिमूर्ती चौकात समोरून येत असलेल्या एम एच 04 बीजी 6487 या पाण्याच्या टँकरने या व्यक्तीला धडक दिली यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू
कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू
author img

By

Published : May 4, 2021, 10:13 PM IST

जालना - कोरोनाग्रस्त आसतानाही रुग्णालयामधून पळ काढणाऱ्या रुग्णाचा रस्त्यातच अपघातात मृत्यू झाला आहे. दुचाकीवरुन जाताना त्याचा अपघात झाला. ही घटना आज (मंगळवारी) दुपारच्या सुमारास घडली आहे.

जुन्या जालन्यातील भाग्योदयनगर भागात राहणारा 48 वर्षीय व्यक्ती कोरोनाचा उपचार घेत होता. आज (मंगळवारी) दुपारीच्या सुमारास हा व्यक्ती दवाखान्यातून बाहेर निघाला आणि मोटरसायकल घेऊन जालन्याहून औरंगाबादकडे जात होता, याच वेळी औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या त्रिमूर्ती चौकात समोरून येत असलेल्या एम एच 04 बीजी 6487 या पाण्याच्या टँकरने या व्यक्तीला धडक दिली यात त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान याप्रकरणी विठ्ठल कचरू भुते (50) राहणार शेवगा यांनी चंदनजिरा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की त्यांचे भाऊजी राजू पंडितराव गायकवाड (48) हे सामान्य रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत असताना रुग्णालयातून परस्पर औरंगाबादकडे जात होते. यादरम्यान ही घटना घडली आहे. या प्रकरणी चंदनजिरा पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करत टँकर जप्त केला आहे.

हेही वाचा -ठाण्यात दागिन्यांची फसवी स्कीम दाखवून लुबाडणाऱ्या टोळीला अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.