जालना - भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने आज विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. बुधवारी दुपारी बारा वाजल्यापासून अमावस्या सुरू होते या अमावस्येतच अंधश्रद्धेला फाटा देत काँग्रेसने मुलाखती घेतल्या. निरीक्षक टी.पी मुंडे यांनी या मुलाखती घेतल्या.
पक्षाकडे ज्या पदाधिकाऱ्यांनी नोंदणी केली आहे त्यांनी कोणताही गाजावाजा व शक्ती प्रदर्शन न करता यावे अशा सूचना दिल्या गेल्या आहेत. त्यामुळे मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये या मुलाखती घेण्यात आल्या.
जालना, परतूर, आणि बदनापूर हे विधानसभा मतदारसंघ काँग्रेससाठी मागून घेण्यात येणार असल्याचे समजते. मुलाखती घेताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, माजी विधान परिषद सदस्य धोंडीराम राठोड, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आर. आर. खडके, कार्याध्यक्ष राजेंद्र राख, शहराध्यक्ष शेख महेमुद, प्राध्यापक सत्संग मुंडे, भीमराव डोंगरे, माजी आमदार कैलास गोरंट्याल, विमल आगलावे यांची उपस्थिती होते.