ETV Bharat / state

Babanrao Lonikar Viral Audio Clip : बबनराव लोणीकरवर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांची मागणी

author img

By

Published : Mar 31, 2022, 5:52 PM IST

इंजिनिअर सोबत लोणीकरांच्या झालेल्या संभाषणात लोणीकर यांनी महावितरणमध्ये काम करणाऱ्या दलित कर्मचाऱ्यास शिवीगाळ केली आहे. तसेच झोपडपट्टीतील लोकांच्या घरी जाऊन वीज कनेक्शन तोडा असे म्हटले आहे. त्यामुळे बबनराव लोणीकर यांच्यावर अँट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल ( Congress leader Demands to a complaint filed on lonikar ) करावा, अशा आशयाची तक्रार जालना पोलिसांत काँग्रेसच्या अनुसूचित विभागाचे जिल्हाध्यक्ष दिनकर घेवंदे यांनी केली आहे.

Babanrao Lonikar Viral Audio Clip
दिनकर घेवंदे

जालना - भाजपचे परतूरचे आमदार बबनराव लोणीकर यांनी त्यांच्या औरंगाबादमधील बंगल्याचे थकीत वीज बिलाअभावी विजेचे मीटर इंजिनिअरने काढून नेले म्हणून त्यांना शिवीगाळ केली आहे. इंजिनिअर सोबत लोणीकरांच्या झालेल्या संभाषणात लोणीकर यांनी महावितरणमध्ये काम करणाऱ्या दलित कर्मचाऱ्यास शिवीगाळ केली आहे. तसेच झोपडपट्टीतील लोकांच्या घरी जाऊन वीज कनेक्शन तोडा असे म्हटले आहे. त्यामुळे बबनराव लोणीकर यांच्यावर अँट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल ( Congress leader Demands to a complaint filed on lonikar ) करावा, अशा आशयाची तक्रार जालना पोलिसांत काँग्रेसच्या अनुसूचित विभागाचे जिल्हाध्यक्ष दिनकर घेवंदे यांनी केली आहे. गुन्हा दाखल न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे.

दिनकर घेवंदे यांची प्रतिक्रिया

बबनराव लोणीकरांनी दिले होते स्पष्टीकरण -

भाजपा आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर ( Bjp Mla Babanrao Lonikar ) यांच्या बंगल्याचे साडेतीन लाख रुपयांचे वीजबिल थकल्याने महावितरणने वीज कापली. त्यामुळे आमदार महोदयांनी चक्क अभियंत्याला शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली ( Babanrao Lonikar Viral Audio Clip ) होती. मात्र, त्यावर आता बबनराव लोणीकर यांनी स्पष्टीकरण दिले ( Babanrao Lonikar Viral Audio Clip Clarification ) आहे. औरंगाबादमध्ये माझा एक बंगला आहे. त्याचे बिल भरले असून वीज खंडित झालेली नाही. कोणीतरी खोटी ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर टाकून मला बदनाम करत आहे. सध्या महावितरण करत असलेली कारवाई चुकीची असून, त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे, असे स्पष्टीकरण लोणीकर यांनी दिले आहे.

Babanrao Lonikar Viral Audio Clip
तक्रार अर्ज

काय आहे प्रकरण?

सध्या थकीत वीज बिल वसूली जोरात सुरु आहे. थकीत बिल न भरणाऱ्या लोकांची वीज कापण्यात येत आहे. औरंगाबाद मध्ये भाजपा आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या बंगल्याचे साडेतीन लाख रुपये बिल बिल थकल्याने महावितरणने वीज कापली. त्यामुळे आमदार महोदय भडकले थेट त्यांनी थेट अभियंत्याला शिवीगाळ केली. चोरांना पकडत नाही आणि बिल भरणाऱ्याला त्रास देतात. माजले का तुम्ही या शब्दांत त्यांनी अभियंत्याला सुनावले. इतकेच नाही तर तुमच्यावर आयकर विभागाची धाड टाकेल. तुमची प्रॉपर्टीची कुंडली काढणार, ऊर्जा मंत्री माझे जवळचे नातेवाईक आहेत. त्यांना सांगून तुम्हाला निलंबित करेल, असे बबनराव लोणीकर यांनी सुनावल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.

हेही वाचा - Babanrao Lonikar Audio Clip : 'त्या' व्हायरल क्लीपबाबत लोणीकरांचे स्पष्टीकरण; म्हणाले, माझे वीज मीटर...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.