ETV Bharat / state

मतदान यादी दुरुस्तीवरून तहसील कार्यालयात गोंधळ, मतदारांनी केले स्टिंग ऑपरेशन - Jalna voters boycott polls news

जालना तहसील अंतर्गत मतदार याद्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. या दुरुस्तीनंतर संबंधित मतदारांना आक्षेप नोंदविण्यासाठीही मुदत देण्यात आली होती. आज या आक्षेपांवर जालनाचे तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी सुनावणी घेतली. या सुनावणीदरम्यान अनेक गावांच्या नागरिकांनी संबंधित सेवकांवर याद्यांमध्ये फेरफार केल्याचा आरोप केला. आक्षेप नोंदविल्यानंतरही मतदार यादीत दुरुस्ती करण्यात आली नाही तर मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशाराही मतदारांनी दिला आहे.

जालना मतदार यादी दुरुस्ती न्यूज
जालना मतदार यादी दुरुस्ती न्यूज
author img

By

Published : Dec 9, 2020, 1:25 PM IST

Updated : Dec 9, 2020, 1:51 PM IST

जालना - जालना तहसील अंतर्गत मतदार याद्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. या दुरुस्तीनंतर संबंधित मतदारांना आक्षेप नोंदविण्यासाठीही मुदत देण्यात आली होती. आज या आक्षेपांवर जालनाचे तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी सुनावणी घेतली. या सुनावणीदरम्यान अनेक गावांच्या नागरिकांनी संबंधित सेवकांवर याद्यांमध्ये फेरफार केल्याचा आरोप केला. या वेळी, ग्रामसेवकासोबत शाब्दिक चकमकही झाली. याच वेळी काही ग्रामस्थांनी तहसीलदारांच्या दालनात गर्दी करून त्यांच्यासोबत झालेल्या शाब्दिक चकमकीचे चित्रीकरणही केले आहे. दरम्यान, आक्षेप नोंदविल्यानंतरही मतदार यादीत दुरुस्ती करण्यात आली नाही तर मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशाराही मतदारांनी दिला आहे.

मतदान यादी दुरुस्तीवरून तहसील कार्यालयात गोंधळ
86 पैकी 35 गावांचे आक्षेप

जालना तालुक्यात 86 ग्रामपंचायतच्या मतदार याद्यांची दुरुस्ती करण्यात आली. या दुरुस्तीनंतर नवीन याद्या संबंधित गावच्या ग्रामपंचायत कार्यालयावर नागरिकांच्या अवलोकनार्थ लावण्यात आल्या होत्या. 1 ते 7 डिसेंबर दरम्यान नागरिकांना या याद्यांवर आक्षेप घेण्याची मुदतही तहसीलदारांनी दिली होती. आज दिनांक आठ रोजी ज्यांनी आक्षेप घेतले आहेत, अशांच्या या अर्जांवर सुनावणी होती. त्यानुसार, आज सकाळपासूनच जालना तहसीलदार कार्यालयात प्रचंड गर्दी झाली होती. सुनावणीदरम्यान ज्या मतदारांचे आक्षेप होते त्यांना ताबडतोब उत्तर हवे होते. हे उत्तर तहसीलदारांनी लगेच न देता संबंधित गावच्या मतदार यादी निवड समितीच्या अहवालावरून निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले. मतदार यादी दुरुस्तीच्या समितीमध्ये ग्रामसेवक, तलाठी आणि कृषी पर्यवेक्षक यांचा समावेश होता. दरम्यान, काही पुढाऱ्यांनी ग्रामसेवकाला हाताशी धरून वार्ड रचनेनुसार मतदार याद्यांची फेरफार केली, असा आरोप जालना तालुक्यातील रेवगाव या गावासह बाजिउम्रद आणि अन्य काही गावकऱ्यांनी केला होता. त्यानुसार हे मतदार सुनावणीसाठी हजर होते. मात्र, योग्य, समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने तहसीलदारांच्या दालनात गर्दी झाली आणि या गर्दीतून तहसीलदार आणि मतदार यांच्यात शाब्दिक चकमकी सुरू झाल्या.

हेही वाचा - ॲमेझॉनला मराठी नको, मग आम्हालाही महाराष्ट्रात अ‌ॅमेझॉन नको; मनसेचा इशारा

मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा

दुरुस्त करण्यात आलेल्या मतदार यादीमध्ये मतदाराचा कोणताही बदल करण्यासाठीचा विनंती अर्ज नसतानाही त्याचे मतदान एका वॉर्डातून दुसऱ्या वार्डात स्थलांतरित केले आहे. या प्रकारामुळे विनाकारण मनस्ताप झालेले मतदार आज सुनावणीला हजर होते. त्यांनी आक्षेपही नोंदविला होता. तरीही तहसीलदार त्यांचे म्हणणे ऐकण्यास तयार नव्हते. जर बदल करण्यासाठी अर्ज केलेला नाही तर, बदल झाला कसा? आणि झाला असेल तर तो पुन्हा दुरुस्त करावा, अशी मागणी या मतदारांनी केली. मात्र, तहसीलदारांनी दिलेल्या उत्तरांमुळे या मतदारांचे समाधान न झाल्याने मतदारांनी संबंधित निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे निवेदन लगेच तहसिलदारांना दिले.

गुरुवारी होणार अंतिम यादी प्रसिद्ध

मतदारांच्या दुरुस्त केलेल्या यादीवर आज हरकती नोंदवून घेतल्यानंतर उद्या याविषयीचा तहसीलदार निर्णय घेणार असून परवा गुरुवारी ही अंतिम यादी संबंधित ग्रामपंचायतीमध्ये मतदारांना उपलब्ध होणार आहे. ही यादी अंतिम असल्यामुळे यापुढे या यादीत कसल्याही प्रकारची दुरुस्ती होणार नसल्याचे तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा - कणकवलीत अज्ञाताने ३ दुचाकी जाळल्या, परिसरात खळबळ

Last Updated : Dec 9, 2020, 1:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.