जालना - गेल्या दोन-तीन दिवसांपासून वादळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये नुकसाभरपाई देण्याची मागणी आमदार संतोष दानवे यांनी केली आहे.
हेक्टरी 50 हजार रुपये नुकसाभरपाई
जालन्याच्या भोकरदन परिसरात गारपीटीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची दानवे यांनी पाहणी केली. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करून त्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये नुकसाभरपाई देण्याची मागणी संतोष दानवे यांनी केली आहे. पाऊस व गारपीटीमुळे भोकरदन तालुक्यातील इब्राहीमपूर, मालखेडा, गोकुळ, नांजा, बाभूळगाव, लिंगेवाडी, पेरजापुर, वाडी-खुर्द, वाडी-बुद्रुक, मनापूर, तडेगाव वाडी, आव्हाना, ठालेवाडी, भिवपूर, सुभानपूर येथील गहू, हरभरा, ज्वारी, कांदा आदी रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले.
हेही वाचा - इंधन दरवाढीने सामान्य नागरिक त्रस्त, जाणून घ्या विविध जिल्ह्यातील दर