ETV Bharat / state

आयुक्त केंद्रेकरांचा आज जालना दौरा, 'त्या' 1 मिनिट 10 सेकंदांनी उडवली वरिष्ठांची धांदल

औरंगाबाद विभागाचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर हे आज (गुरुवार) जालना जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यांच्या दौऱ्याविषयी कमालीची गुप्तता पाळण्यात येत होती. त्यामुळे अनेक अधिकाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली.

Divisional Commissioner of Aurangabad Division Sunil Kendrakar visits Jalna district
आयुक्तांच्या त्या 1 मिनिट 10 सेकंदांनी उडवली वरिष्ठांची धांदल...
author img

By

Published : Jun 18, 2020, 4:17 PM IST

Updated : Jun 18, 2020, 4:43 PM IST

जालना - औरंगाबाद विभागाचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर हे आज (गुरुवार) जालना जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यांच्या दौऱ्याविषयी कमालीची गुप्तता पाळण्यात येत होती. त्यामुळे अनेक अधिकाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. विशेष म्हणजे आयुक्त जिल्हाधिकारी कार्यालयातून 1 मिनिट 10 सेकंदामध्येच निघून गेले.

आयुक्तांच्या त्या 1 मिनिट 10 सेकंदांनी उडवली वरिष्ठांची धांदल...
आयुक्त सुनील केंद्रेकर हे त्यांच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. नियमानुसार त्यांची पोर्चमध्ये आरोग्य तपासणी झाली आणि क्षणभरातच रुग्णालय कुठे आहे? असे म्हणत ते परत फिरले आणि थेट जिल्हा सामान्य रुग्णालय गाठले. त्यामुळे शिष्टाचारानुसार आयुक्तांची वाट पाहत बसलेले जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांची चांगलीच धांदल उडाली. आयुक्त सामान्य रुग्णालयात पोहोचून पाहणी करू लागले. मात्र, त्यापाठोपाठ जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर हजर झाले आणि मग नंतर जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, तहसीलदार श्रीकांत भुजबळ हेदेखील त्यांच्यामध्ये सहभागी झाले. जिल्हाधिकारी कार्यालयातून 1 मिनिट 10 सेकंदातच आयुक्त परत फिरल्यामुळे वरिष्ठांची मात्र चांगलीच धांदल उडाली.

Last Updated : Jun 18, 2020, 4:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.