ETV Bharat / state

जालन्यात मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात; जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

जालना लोकसभा मतदारसंघातील जालना, बदनापूर, भोकरदन, सिल्लोड, पैठण आणि फुलंब्री या सहा विधानसभा मतदारसंघाचा जालना लोकसभा मतदारसंघात समावेश आहे. एकूण २० उमेदवार या निवडणूक रिंगणात असून कोणाची लॉटरी लागणार हे लवकरच कळणार आहे.

मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात
author img

By

Published : May 21, 2019, 5:24 PM IST

जालना - जालना लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. आज निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, निवडणूक उपजिल्हाधिकारी राजीव नंदकर, पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांनी मतमोजणीच्या ठिकाणी जाऊन मतमोजणी केंद्राची पाहणी केली व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही दिले.

मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात

जालना-औरंगाबाद महामार्गावर जालन्यापासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या संकेत फूड प्रॉडक्टच्या बंद असलेल्या गोदामामध्ये ही मतमोजणी होणार आहे. गेल्या महिन्याभरापासून कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये इथे मतदान यंत्र ठेवण्यात आले होते. जालना लोकसभा मतदारसंघातील जालना, बदनापूर, भोकरदन, सिल्लोड, पैठण आणि फुलंब्री या सहा विधानसभा मतदारसंघाचा जालना लोकसभा मतदारसंघात समावेश आहे. एकूण २० उमेदवार या निवडणूक रिंगणात असून कोणाची लॉटरी लागणार हे लवकरच कळणार आहे. परंतु गेल्या महिन्यात २३ तारखेला झालेल्या मतदानानंतर ज्या प्रमुख तीन उमेदवारांमध्ये ही लढत होण्याची शक्यता आहे त्यापैकी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रावसाहेब दानवे, काँग्रेसचे उमेदवार विलास अवताडे आणि बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार डॉक्टर शरदचंद्र वानखेडे हे आपापल्या गावी जाऊन स्थिरावले होते. त्यामुळे जालना शहरात असलेले त्यांचे कार्यकर्ते देखील महिनाभर फिरतीवर होते. मात्र उद्या हे कार्यकर्ते हे जमायला सुरुवात होणार असून मतमोजणीच्या दिवशी मतदान प्रतिनिधी म्हणून देखील या कार्यकर्त्यांवर जबाबदारी टाकण्यात आली आहे. मतमोजणीच्या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक चैतन्य यांनी दिली. तसेच राज्य राखीव दलाची तुकडेदेखील तैनात करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान गेल्या महिन्याभरापासून थंड असलेली निवडणुकीची रणधुमाळी उद्यापासून पुन्हा सुरू होणार आहे आणि जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत ही रणधुमाळी, आरोप-प्रत्यारोप, चर्चेला उधाण हे सुरूच राहणार आहे.

Intro:18 जालना लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे .आज निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, निवडणूक उपजिल्हाधिकारी राजीव नंदकर ,आणि पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांनी मतमोजणीच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आणि मतमोजणी केंद्राची पाहणी केली.

Body:जालना औरंगाबाद महामार्गावर जालन्यापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या संकेत फूड प्रॉडक्ट च्या बंद असलेल्या गोदामामध्ये ही मतमोजणी होणार आहे. गेल्या महिन्याभरापासून कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये इथे मतदान यंत्र ठेवण्यात आले होते. जालना लोकसभा मतदारसंघातील जालना, बदनापूर, भोकरदन, सिल्लोड ,पैठण, आणि फुलंब्री या सहा विधानसभा मतदारसंघाचा जालना लोकसभा मतदारसंघात समावेश आहे. एकूण वीस उमेदवार या निवडणूक रिंगणात असून कोणाची लॉटरी लागणार हे लवकरच कळणार आहे. परंतु गेल्या महिन्यात 23 तारखेला झालेल्या मतदानानंतर ज्या प्रमुख तीन उमेदवारांमध्ये ही लढत होण्याची शक्यता आहे त्यापैकी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रावसाहेब दानवे ,काँग्रेसचे उमेदवार विलास अवताडे, आणि बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार डॉक्टर शरच्चंद्र वानखेडे, हे आपापल्या गावी जाऊन स्थिरावले होते.त्यामुळे जालना शहरात असलेले यांचे कार्यकर्ते देखील महिनाभर फिरतीवर होते. मात्र उद्या हे कार्यकर्ते हे जमायला सुरुवात होणार असून मतमोजणीच्या दिवशी मतदान प्रतिनिधी म्हणून देखील या कार्यकर्त्यांवर जबाबदारी टाकण्यात आली आहे. मतमोजणीच्या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक चैतन्य यांनी दिली. तसेच राज्य राखीव दलाची तुकडेदेखील तैनात करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले .
दरम्यान गेल्या महिन्याभरापासून थंड असलेली निवडणुकीची रणधुमाळी उद्यापासून पुन्हा सुरू होणार आहे ,आणि जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत ही रणधुमाळी, आरोप-प्रत्यारोप, चर्चेला उधाण ,हे सुरूच राहणार आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.