जालना - जिल्ह्यातील वाडी बुद्रुक येथे संत गाडगेबाबा व सदगुरु बाबा हरदेव सिंह महाराज यांच्या जयंतीनिमित्त गावामध्ये स्वच्छता मोहीम अभियान राबविण्यात आले. यावेळी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून स्वच्छता मोहिमेला सुरुवात करण्यात आली.
संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन व छत्रपती शिवाजी महाराज युवा संघर्ष मित्र मंडळ यांच्या वतीने संपूर्ण गावात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. यावेळी सरपंच आत्माराम सुरडकर, उपसरपंच सुभाष चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते मारुती सोनवणे, सांडू सुरडकर, कौतिकराव चोरमारे, रवि चोरमारे, अनिल महाराज, आत्माराम चोरमारे यांच्यासह गावकरी मंडळी, ग्रामपंचायत पदाधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.