ETV Bharat / state

संचलनादरम्यान भोकरदन पोलिसांवर नागरिकांकडून पुष्पवृष्टी - Bhokardan Police latest news

डॉक्टर, पोलीस, सफाई कामगार आपला जीव धोक्यात घालून नागरिकांचे संरक्षण करत आहेत. याची जाणीव ठेवून भोकरदन शहरवासीयांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पुष्पवृष्टी करून स्वागत केले. भोकरदन शहरामधून पोलीस प्रशासनाच्यावतीने पथसंचलन करण्यात आले.

Bhokardan Police
भोकरदन पोलीस
author img

By

Published : May 24, 2020, 2:03 PM IST

जालना - कोरोनाने जगभरात थैमान घातले असून देशभरात लॉकडाऊनमुळे जाहीर करण्यात आले आहे. मात्र, डॉक्टर, पोलीस, सफाई कामगार आपला जीव धोक्यात घालून नागरिकांचे संरक्षण करत आहेत. याची जाणीव ठेवून भोकरदन शहरवासीयांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पुष्पवृष्टी करून स्वागत केले.

संचलनादरम्यान भोकरदन पोलिसांवर नागरिकांनी केली पुष्पवृष्टी

भोकरदन शहरामधून पोलीस प्रशासनाच्यावतीने पथसंचलन करण्यात आले. यावेळी शहरातील प्रत्येक घरातून फुलांचा वर्षाव करून या संचलनात सहभागी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. काही महिलांनी पोलिसांचे औक्षणही केले. या संचलनात उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्यासह सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.