ETV Bharat / state

बदनापुरात नाताळचा उत्साह; ख्रिस्ती बांधवांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन - jalna Christmas celebration

जालना-औरंगाबाद मुख्य रस्त्यावर बसस्थानकालगतच चर्च असून या चर्चला रंगीबेरंगी दिव्यांच्या माळांनी सजवले आहे. रात्री दहाला नाताळ गीते, पवित्र मिसा (प्रार्थना) करण्यात आली. चर्चमध्ये ख्रिस्त जन्माचा देखावा सादर करण्यात आलेला आहे. नाताळनिमित्त जागोजागी ख्रिसमस ट्री सजविण्यात आले आहेत.

jalna
बदनापुरात नाताळचा उत्साह
author img

By

Published : Dec 25, 2019, 7:53 AM IST

जालना - नाताळ हा ख्रिस्ती बांधवांचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. नाताळनिमित्त बुधवारी ख्रिस्ती बांधवांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासूनच या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. बदनापूर येथील ख्रिस्ती बांधवांनी घरांवर आकाशकंदील लावून सण साजरा केला आहे. चर्चंमध्येही रोषणाई आणि सुंदर सजावट करण्यात आली आहे.

बदनापुरात नाताळचा उत्साह

हेही वाचा - ख्रिसमसदिवशीच जनशताब्दी रेल्वे रद्द , प्रवाशांचे हाल

जालना-औरंगाबाद मुख्य रस्त्यावर बसस्थानकालगतच चर्च असून या चर्चला रंगीबेरंगी दिव्यांची आरास केली आहे. रात्री दहाला नाताळ गीते, पवित्र मिसा (प्रार्थना) करण्यात आली. चर्चमध्ये ख्रिस्त जन्माचा देखावा सादर करण्यात आलेला आहे. नाताळनिमित्त जागोजागी ख्रिसमस ट्री सजविण्यात आले आहेत. विविध संस्थांतर्फे धार्मिक गीतगायन स्पर्धा, ख्रिस्त जन्माची नाटिका, रांगोळी स्पर्धा यांसह निरनिराळे कार्यक्रम ठेवण्यात आलेले असून ३१ डिसेंबरच्या रात्री नवीन वर्षाच्या स्वागतापर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा - एनआरसी आणि सीएए विरोधात सोमवारी 'भोकरदन बंद'

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच १ जानेवारीला सकाळी प्रार्थना आणि नूतन वर्षाची उपासना होणार आहे. शहरातील चर्चच्या इमारतींना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतानिमित्तासाठी शहरात विविध उपक्रम सुरू आहेत. केवळ चर्चच नव्हे, तर ख्रिस्ती बांधवांनी आपल्या घरांवरही आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. शहरात सर्वत्र नाताळचा उत्साह दिसून येत असून गृहिणी गोड-धोड बनवण्यात व्यस्त असून बालगोपालांतही प्रचंड उत्साह आहे.

Intro:बदनापूर, दि. २४ (प्रतिनिधी): ख्रिस्ती बांधवांचा नाताळ (ख्रिसमस) सण मोठया उत्साहात साजरा होणार असून बुधवारी नाताळाचा आनंद द्विगुणीत होत असतानाच ख्रिस्ती बांधवांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासूनच भरगच्च कार्यक्रमांना प्रारंभ होणार असून बदनापूर येथील ख्रिस्ती बांधवांमध्ये अलोट उत्साह आहे. घरांवर आकाशकंदील लावण्यात आले आहेत. चर्चंमध्येही रोषणाई व सुंदर सजावट करण्यात आली आहे.
जालना- औरंगाबाद मुख्य रस्त्यावर बसस्थानका लगतच चर्च असून या चर्चवर रंगीबेरंगी दिव्यांच्या माळा लावलेला असून आकर्षक सजावट व रोषणाई केलेली आहे. बिशप आज मंगळवारी मध्यरात्री नाताळचा शुभसंदेश देणार आहेत. रात्री दहाला नाताळ गीते, अकरा वाजता पवित्र मिसा (प्रार्थना) होईल. बुधवारी (दि. २५) सकाळी आठला पवित्र मिसा होईल. तसेच महिलांसाठी विशेष कार्यक्रम होईल. नाताळनिमित्त आकर्षक सजावट व रोषणाई करण्यात आली आहे. ख्रिस्त जन्माचा देखावा सादर करण्यात आलेला आहे. नाताळनिमित्ताने जागोजागी ख्रिसमस ट्री सजविण्यात आले होते. विविध संस्थांतर्फे धार्मिक गीतगायन स्पर्धा, ख्रिस्त जन्माची नाटिका, रांगोळी स्पर्धा यांसह निरनिराळे कार्यक्रम ठेवण्यात आलेले असून दि. ३१ रोजी रात्री नवीन वर्षाच्या स्वागतापर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले असून नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे दि. १ जानेवारी रोजी सकाळी प्रार्थना व नूतन वर्षाची उपासना होणार आहे. शहरातील चर्चच्या इमारतींना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. नाताळ व नववर्षाच्या स्वागतानिमित्ताने शहरात विविध उपक्रम सुरू आहेत. केवळ चर्चच नव्हे, तर ख्रिस्ती बांधवांनी आपल्या घरांवरही आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. शहरात सर्वत्र नाताळचा उत्साह दिसून येत असून गृहिणी गोड-धोड बनवण्यात व्यस्त असून बालगोपालांतही प्रचंड उत्साह आहे.Body:सजवलेले चर्चConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.