ETV Bharat / state

जालन्यात अतिक्रमणांवर पोलीस बंदोबस्तात कारवाई - Jalna Municipal Council action on encroachment

गांधीचमन परिसरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी नगरपालिकेचे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांनी पोलीस बंदोबस्ताची मागणी केली होती. त्यानुसार आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन हे त्यांच्या सहकार्‍यांसह कारवाईच्या ठिकाणी उपस्थित राहिले.

अतिक्रमण कारवाई
अतिक्रमण कारवाई
author img

By

Published : Feb 3, 2021, 7:36 PM IST

Updated : Feb 3, 2021, 7:52 PM IST

जालना - शहरातील गांधीचमन परिसरातील अतिक्रमणांवर नगरपालिकेने कारवाईचा हातोडा उगारला आहे. ही अतिक्रमणांवरील कारवाई पोलीस बंदोबस्तात करण्यात आली आहे.

गांधीचमन परिसरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी नगरपालिकेचे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांनी पोलीस बंदोबस्ताची मागणी केली होती. त्यानुसार आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमाराला कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन हे त्यांच्या सहकार्‍यांसह कारवाईच्या ठिकाणी उपस्थित राहिले.

अतिक्रमणांवर पोलीस बंदोबस्तात कारवाई

हेही वाचा-सोन्याच्या दरातील घसरणीनंतर चांदी प्रति किलो १,९५५ रुपयांनी स्वस्त

अतिक्रमण काढलेल्या ठिकाणी वाहनतळ व्हावे-
नगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक प्रभु कसबे, पंडित पवार, अरुण वानखेडे, शोएब खान ,श्रावण सराटे व आदी कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या साह्याने अतिक्रमणे काढली आहेत. पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन म्हणाले, की पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणांवरील कारवाई करण्यात आलेली आहे. या परिसरात वाहनतळ किंवा गार्डन करावे, अशी महाजन यांनी अपेक्षा व्यक्त केली.

अतिक्रमण कारवाई
अतिक्रमण कारवाई

हेही वाचा-कच्च्या तेलाचे दर वाढूनही पेट्रोल-डिझेलचे दर 'जैसे थे'

अतिक्रमणांमुळे रस्ते वाहतुकीला अडथळा-
गांधीचमन परिसरात स्त्री रुग्णालय आहे. त्यामुळे वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. दोन्ही प्रवेशद्वाराच्या बाजूला चहाच्या दुकानांनी आणि भाजीवाल्यांच्या हातगाड्यांची गर्दी होते. अशा गर्दीमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. त्यामुळे रोज वादविवादांचे प्रसंग घडतात. रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाले हे नियमाला जुमानत नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर नगरापालिकेच्या कारवाई केल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Last Updated : Feb 3, 2021, 7:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.