ETV Bharat / state

Raosaheb Danve : महाविकास आघाडीतील धूसफूस राज्याला हानीकारक - रावसाहेब दानवे

author img

By

Published : Feb 13, 2022, 10:42 PM IST

एकेकाळी भाजपाचे देशात केवळ दोन खासदार निवडून आले होते. या दोन खासदारांच्या बळावर भाजपने कार्यकर्त्यांची मजबूत फळी उभी करत देशात 303 खासदार निवडून आणले आहेत. भाजपचे कार्यकर्ते पळपुटे नसून याच कार्यकर्त्यांच्या बळावर 2024 ला पुन्हा या देशात भाजपची सत्ता येईल, असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे ( Central Minister of State Raosaheb Danve ) यांनी व्यक्त केला.

रावसाहेब दानवे
रावसाहेब दानवे

जालना - महाविकास आघाडीतील धुसफूशी या राज्यासाठी हानीकारक आहेत, अशी टीका केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे ( Central Minister of State Raosaheb Danve ) यांनी केली आहे. ते बदनापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रवादीने सत्तेत असलेल्या आपल्याच मित्र पक्षाचे नगरसेवक फोडले त्यानंतर आता काँग्रेसने राष्ट्रवादीचे नगरसेवक फोडले. हे केवळ जनतेची दिशाभूल करण्यासाठी एककलमी कार्यक्रम महाविकास आघाडीने सुरू केला आहे, अशीही टीका दानवे यांनी केली.

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे

राज्यात पुन्हा भाजपची सत्ता येणार - भाजपमधील लोक दुसऱ्या पक्षात जाऊ नये यासाठी महाविकास आघाडी सरकार पडणार, असे आश्वासन दिले जाते, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress State President Nana Patole ) यांनी केले. यावर दानवे म्हणाले, नाना पटोले यांना पक्षातून बाहेर पडण्याचा चांगला अनुभव आहे. एकेकाळी भाजपाचे देशात केवळ दोन खासदार निवडून आले होते. या दोन खासदारांच्या बळावर भाजपने कार्यकर्त्यांची मजबूत फळी उभी करत देशात 303 खासदार निवडून आणले आहेत. भाजपचे कार्यकर्ते पळपुटे नसून याच कार्यकर्त्यांच्या बळावर 2024 ला पुन्हा या राज्यात भाजपची सत्ता येईल, असा विश्वासही दानवे यांनी व्यक्त केला.

मुंबई नागपूर बुलेट ट्रेनचा आराखडा लवकरच - मुंबई नागपूर बुलेट ट्रेनचा ( Mumbai Nagpur Bullet Train ) आराखडा या महिन्याच्या शेवटी किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येईल, असे केंद्रीय राज्यमंत्री दानवे म्हणाले. मोठ्या प्रमाणात जमीन संपादीत झाली असून केवळ 38 टक्के जमीन संपादीत होणे बाकी आहे, असेही दानवे म्हणाले.

हेही वाचा - Rajesh Tope on Corona : मार्चच्या मध्यापर्यंत तिसरी लाट ओसरेल; आरोग्यमंत्र्यांना विश्वास

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.