ETV Bharat / state

'केंद्र सरकारने गरिबांसाठीही कोरोनावरील लस मोफत द्यावी' - आरोग्यमंत्री राजेश टोपे बातमी

केंद्र सरकारने कोरनावरील लस मोफत देण्याचे जाहीर केले. मात्र, ही लस आरोग्य कर्मचारी व कोरोना योद्ध्यांनाच मोफत दिली जाणार असल्याचेही सांगितले. यावरुन राज्यातील आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मोफत लस सर्व गरिब कुटुंबाला देण्यात यावी, अशी मागणी करण्यार असल्याचे म्हणाले.

राजेश टोपे
राजेश टोपे
author img

By

Published : Jan 2, 2021, 3:43 PM IST

Updated : Jan 2, 2021, 4:12 PM IST

जालना - आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या आणि त्यासंदर्भात लढा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच मोफत लस देण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे. तेवढ्यावरच न थांबता केंद्र सरकारने दारिद्र्यरेषेखाली असलेल्या गरीब कुटुंबाला मोफत लस द्यावी, अशी मागणी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली आहे.

बोलताना आरोग्यमंत्री

रस्ते व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची पत्रकार परिषद सुरू होती. दरम्यान, आरोग्य मंत्री राजेश टोपे हे तिथे आल्यामुळे टोपे यांची पत्रकार परिषद सुरू झाली व अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषद आटोपती घेतली.

राज्याने जनतेला वाऱ्यावर नाही सोडले

केंद्र सरकारने 1 सप्टेंबरपासून राज्याला आरोग्य क्षेत्रात देण्यात येणारी सर्व मदत बंद केली आहे. आरटीपीसीआर कीट मिळत नाहीत, पीपीई कीट बंद आहेत. तरीही राज्याने जनतेला वाऱ्यावर सोडलेले नाही. उलट महागडी औषधे राज्यातील रुग्णांसाठी उपलब्ध केल्याचेही मंत्री टोपे म्हणाले.

राज्याची स्थिती दयनीय नाही

राज्याची आर्थिक स्थिती दयनीय असल्याचे आरोप केले जात आहेत. मात्र, तशी स्थिती राज्याची नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सूचना दिल्या आहेत की पूर्वीप्रमाणेच जिल्हा नियोजन व विकास समितीचा खर्च करून विकास करावा.

चव्हाण यांची पत्रकार परिषद टोपेंनी वळवली

रस्ते व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची पत्रकार परिषद शासकीय विश्रामगृहात सुरू होती. ही सुरू असतानाच आरोग्य मंत्री राजेश टोपे हे अशोक चव्हाण यांना पुष्पगुच्छ देण्यासाठी आले. पुष्पगुच्छ देऊन निघून जाणार असल्याचे ते म्हणाले होते. मात्र, ते बसल्यानंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची पत्रकार परिषद सुरू झाली. त्यामुळे मंत्री अशोक चव्हाण यांना त्यांची पत्रकार परिषद आटोपती घ्यावी लागली.

हेही वाचा - नऊ महिन्यानंतर कोरोनातून वेळ काढत आशा स्वयंसेविकांचे विविध गुणदर्शन

हेही वाचा - लसीकरणानंतर सोशल डिस्टन्सिंग, मास्क लावणे बंधनकारक आहे का?, आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

Last Updated : Jan 2, 2021, 4:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.