ETV Bharat / state

फेसबुकवर शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त पोस्ट, गुन्हा दाखल - फेसबुकवर शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त पोस्ट

खालेद हाजी मोहम्मद कुरेशी यानी 3 मे पूर्वी शिवाजी महाराज सिंहासनावर बसलेल्या फोटोवर स्वतःचा चेहरा लावून फेसबुक प्रोफाइलला ठेवला होता. यासोबतच तीस सेकंदाचा व्हिडिओ शेअर करत "चेहरा क्या देखते हो, दिल में उतर कर देखो" असे बोल असलेल्या गाण्याचा वापर करून धार्मिक तेढ निर्माण होईल असे कृत्य केले.

फेसबुकवर शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त पोस्ट

author img

By

Published : May 5, 2020, 7:57 AM IST

जालना - फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट टाकल्याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खालीद हाजी मोहम्मद कुरेशी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. कुरेशी याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनावर बसलेल्या फोटोवर स्वतःचा चेहरा लावून तो फेसबुकवर अपलोड केला होता.

कदीम जालना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप अरुण पोवार यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की खालेद हाजी मोहम्मद कुरेशी यानी 3 मे पूर्वी शिवाजी महाराज सिंहासनावर बसलेल्या फोटोवर स्वतःचा चेहरा लावून फेसबुक प्रोफाइलला ठेवला होता. यासोबतच तीस सेकंदाचा व्हिडिओ शेअर करत "चेहरा क्या देखते हो, दिल में उतर कर देखो" असे बोल असलेल्या गाण्याचा वापर करून धार्मिक तेढ निर्माण होईल असे कृत्य केले. याप्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यामध्ये कलम 295 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन करीत आहेत.

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.