जालना - बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी (आज बुधवारी, दि. 26)रोजी माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना राखी बांधून औक्षण केले. 'भाऊ'ना सुख-समृद्धी, निरोगी आयुष्य आणि सुयश यावेळी प्रितम यांनी चिंतिले आहे. पंकजा मुंडे यांच्या लहान भगिनी असलेल्या प्रीतम दर्शना बंगल्यावर येऊन अर्जुनराव खोतकर यांना राखी बांधली. खोतकर आणि मुंडे कुटुंबातील ऋणानुबंधास यावेळी उजाळा मिळाला. ज्येष्ठ भाजप नेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीने अर्जुन खोतकर यांना यावेळी गहिवरून आले. ताई, मी सदैव आपल्या पाठीशी राहील, अशी ग्वाही खोतकर यांनी यावेळी प्रितम यांना दिली आहे. तर, एक बहीण म्हणून मी कधीच खोतकर परिवाराला अंतर देणार नाही, अशी भावना प्रीतम मुंडे यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
मुंडे भगिनिंची शिवसेनेशी जवळीक निर्माण झाल्याची चर्चा
या राखी बांधण्याच्या कार्यक्रमात प्रितम मुंडे यांनी आणि खोतकर यांनी आपण एकमेकांच्या खंबीर पाठीशी असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यावरून मुंडे भगिनी शिवसेनेत जाणारका? या चर्चांना उधान आले आहे.
...तेव्हा खोतकरांनी पंकजा मुंडेंना शिवसेनेत येण्याची दिली होती ऑफर
काही दिवसांपूर्वी भाजपचे जेष्ट नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर अर्जुन खोतकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते की, 'भारतीय जनता पक्षाने जे पेरले ते आता उगवत आहे. मागील पाच वर्षांमध्ये या पक्षाने भरती सुरू केली होती. आता त्याच पक्षाला उतरती कळा सुरू झाली आहे. खडसेंप्रमाणेच भारतीय जनता पक्षाचे अजून काही दिग्गज नेते पक्षांतर करतील, कारण ते भारतीय जनता पक्षावर नाराज आहेत आणि हे नेते आपापल्या बुद्धिमत्तेप्रमाणे निर्णय घेऊन इतर पक्षांमध्ये जातील. तसेच, पंकजा मुंडे यांच्यासह शिवसेनेची दारे सर्वांसाठी उघडी आहेत. मग त्या पंकजा मुंडे असो किंवा इतर कोणी असही खोतकर त्यावेळी म्हणाले होते.
हेही वाचा - 'पंकजाच नव्हे तर सर्वांसाठीच शिवसेनेची दारं खुली