ETV Bharat / state

जालन्यातून कैलास गोरंट्याल तर परतूरमधून बबनराव लोणीकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

राज्याचे पाणीपुरवठा मंत्री कथा परतूरचे विद्यमान आमदार असलेल्या बबनराव लोणीकर यांनी परतूर तहसीलमध्ये शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

जालन्यातून कैलास गोरंट्याल तर परतूरमधून बबनराव लोणीकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल
author img

By

Published : Oct 3, 2019, 8:12 PM IST

Updated : Oct 3, 2019, 10:58 PM IST

जालना - भारतीय जनता पक्षाचे परतूर मतदार संघाचे उमेदवार म्हणून बबनराव लोणीकर यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी जालना विधानसभेसाठी अर्ज दाखल केला आहे.

जालन्यातून कैलास गोरंट्याल तर परतूरमधून बबनराव लोणीकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

राज्याचे पाणीपुरवठा मंत्री कथा परतूरचे विद्यमान आमदार असलेल्या लोणीकर यांनी परतुर तहसीलमध्ये शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसचे माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांच्याशी त्यांची मुख्य लढत राहणार आहे. परतुर तहसील कार्यालयात अर्ज भरल्यानंतर रेल्वे गेट पासून ते तहसील कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली. तसेच, जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर जाहीर सभेचे आयोजनही करण्यात आले होते. यावेळी, सोबत भाजपचे युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्यासह, साखरे आप्पा, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष भांदर्गे पाटील आदी उपस्थित होते.

हेही वाचा - नरेंद्र पवारांना तिकीट द्या अन्यथा मतदानावर बहिष्कार, कैकाडी समाजाचा इशारा

तर, माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी साध्या पद्धतीने शक्तिप्रदर्शन न करता काँग्रेसतर्फे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांची टक्कर राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्याशी असणार आहे. खोतकर यांनी दोन दिवसांपूर्वी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Intro:Body:

state news

Conclusion:
Last Updated : Oct 3, 2019, 10:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.