ETV Bharat / state

श्रावणमास विशेष : उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराच्या सरळ रेषेमध्ये आहे जालन्यातील भोलेनाथाचे देवस्थान - शिवलिंग

शहरापासून रोहन वाडी रस्त्यावर सुमारे आठ-दहा किलोमीटर वर भोलेनाथ हे देवस्थान आहे. पाच एकर जागेमध्ये शिवानंद स्वामी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत भोलेनाथाची भव्यदिव्य पिंड आहे. जमिनीपासून सुमारे दहा फूट खोल भुयारात भोलेस्वरांची पिंड आहे. याच पिंडीच्या वरच्या मजल्यावर अगदी पिंडीच्या वर शिवलिंगावर मुकुट धारण केलेली पिंड आहे. या पिंडीच्या समोरच गाभाऱ्यामध्ये उजव्या बाजूला श्री गणेश तर डाव्या बाजूला माता अन्नपूर्ण विराजमान आहेत.

जालण्यातील भोलेनाथ देवस्थान
author img

By

Published : Aug 5, 2019, 8:43 AM IST

जालना- श्रावण महिन्यातील आज पहिला सोमवार आहे. त्यानिमित्ताने विवध ठिकाणच्या महादेव मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी होताना पाहायला मिळत आहे. त्याप्रमाणेच शहरापासून जवळच असलेल्या प्रसिद्ध भोलेनाथ मंदिरातही आज श्रावण सोमवारनिमित्त भाविकांच्या रांगा लागल्या आहेत. श्रावण मासानिमित्ताने या भोलेनाथ मंदिराबद्दल ईटीव्ही भारते हा विशेष आढावा घेतला आहे.

शहरापासून रोहन वाडी रस्त्यावर सुमारे आठ-दहा किलोमीटरवर भोलेनाथ हे देवस्थान आहे. पाच एकर जागेमध्ये शिवानंद स्वामी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत भोलेनाथाची भव्यदिव्य पिंड आहे. जमिनीपासून सुमारे दहा फूट खोल भुयारात भोलेश्वरांची पिंड आहे. याच पिंडीच्या वरच्या मजल्यावर अगदी पिंडीच्या वर शिवलिंगावर मुकुट धारण केलेली पिंड आहे. या पिंडीच्या समोरच गाभाऱ्यामध्ये उजव्या बाजूला श्री गणेश तर डाव्या बाजूला माता अन्नपूर्ण विराजमान आहेत.

गाभाऱ्यामध्ये भव्य नंदीने ठाण मांडले आहे. गाभाऱ्यात वरच्या चारही बाजूने शुद्ध हवा आणि प्रकाश येतो. गाभाऱ्याचे प्रवेशद्वार पूर्वेकडे आहे. तर दक्षिण आणि उत्तर अशा दोन्ही दिशांना देखील द्वार आहेत. मात्र, हे द्वार गर्दीच्या वेळी आणि महाशिवरात्रीला उघडले जातात. मंदिरात प्रवेश करताच दिसते ती मुकुटधारी शिवलिंग त्यानंतर पिंडीचे दर्शन घेण्यासाठी गाभाऱ्यामध्ये खाली उतरावे लागते. इथे पिंडीचे दर्शन घेऊन दुसऱ्या रस्त्याने वर येता येते. पायऱ्या चढून वर आल्यानंतर समोर दिसते ती पुरातन विहीर, जी विटांमध्ये नक्षीकाम केलेले असल्यामुळे भाविकांना आश्चर्याने तोंडात बोट घालायला लावते. त्याच्या बाजूलाच बजरंग बली आणि नागदेवता देखील स्थापित आहेत. परिसरामध्ये बेल, पिंपळ अशा प्रकारची मोठमोठी झाडे असल्यामुळे परिसरात निसर्गरम्य वातावरण कायम असते.

जालन्यातील भोलेनाथ देवस्थान
मंदिराच्या बाहेर एका बाजूला शिवानंद स्वामी महाराजांचे मंदिर आहे. या मंदिरात त्यांची मूर्ती देखील स्थापित आहे. भोले स्वराच्या मुख्य मंदिरासमोर दोन्ही बाजूंनी चिरेबंदी दगडांमध्ये दीपमाळा आहेत. सध्याच्या कलियुगात प्रत्येक गोष्ट नकली आणि दिखाऊ मिळते. अशा परिस्थितीत ही या चिरेबंदी दीपमाळा भाविकांना आकर्षित करते. भक्तांच्या नवसाला पावणारा भोलेनाथ म्हणूनही ही या देवस्थानची ख्याती आहे. त्यामुळे श्रावणात जवळपास महिनाभर इथे महाप्रसादाचा कार्यक्रम सुरू असतो. मंदिराच्या भव्य दिव्य परिसरामुळे भाविक इथे येऊन पर्यटनाचाही आनंद घेतात. रिमझिम पडणाऱ्या पावसामध्ये बच्चेकंपनीही मनसोक्त आनंद लुटते.
मंदिराचा इतिहास
या मंदिराबद्दल लिखित स्वरूपात पुराणात माहिती सापडत नाही. मात्र, सात-आठशे वर्षापूर्वीचे एक पुरातन शिवलिंग असलेले इथे एक छोटेसे मंदिर होते असे सांगितले जाते. या मंदिराचा शिवानंद स्वामी महाराजांनी जीर्णोद्धार करण्यास सुरुवात केली. हळूहळू हे मंदिर नावारूपास आले. सद्या इथे मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे, येणाऱ्या भक्तांना इथे राहून सेवा करता यावी यासाठी इथे भक्त निवास बांधण्यात येत आहे.

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या उज्जैन येथील महाकालेश्वर या मंदिराच्या सरळ रेषेमध्ये हे मंदिर आहे. दोन्ही मंदिराचे अक्षांश रेखांश जवळपास सारखेच आहे. याच सोबत आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कावड दिंडी सोहळा गेल्या 22 वर्षांपासून सुरू आहे. ब्रह्मगिरी पर्वतावर उगम झालेल्या आणि पुढे वाहत येत शहागड पर्यंत आलेल्या गोदावरी गंगेचे पाणी कावडीच्या माध्यमातून आणून पिंडीला अभिषेक केला जातो. यावर्षी दिनांक 22 ऑगस्ट रोजी साडेबारा वाजता ही कावड दिंडी शहागड येथील गोदावरी गंगेचे पाणी घेऊन भक्त निघणार आहे. रविवार दिनांक 25 रोजी जालना शहरात आगमन होऊन मिरवणुकीच्याद्वारे रोहन वाडी मार्गे श्रीक्षेत्र भोलेश्वर बर्डी येथे मुक्कामी येणार आहे. त्यानंतर सोमवार दिनांक 26 रोजी भोलेश्वर भगवनला अभिषेक, आणि काल्याचे किर्तन करून महाप्रसादद्वारे कावड दिंडीचा समारोप होणार आहे. अनेक भक्त या दिंडीमध्ये सहभागी होतात. सध्या या संस्थानचे मठाधिपती म्हणून शिवप्रसाद सच्चिदानंद स्वामी महाराज हे कारभार पाहत आहेत.

Intro:जालना शहरापासून रोहन वाडी रस्त्यावर सुमारे आठ-दहा किलोमीटर वर भोलेनाथ हे देवस्थान आहे .पाच एकर जागेमध्ये शिवानंद स्वामी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत भोलेनाथाची भव्यदिव्य पिंडी आहे. जमिनीपासून सुमारे दहा फूट खोल भुयारात भोलेस्वरांची पिंडी आहे. याच पिंडीच्या वरच्या मजल्यावर अगदी पिंडीच्या वर शिवलिंगावर मुकुट धारण केलेली पिंडी . या पिंडीच्या समोरच गाभाऱ्यामध्ये उजव्या बाजूला श्री गणेश तर डाव्या बाजूला माता अन्नपूर्ण विराजमान आहेत .गाभाऱ्यामध्ये भव्य नंदीने ठाण मांडले आहे .गाभाऱ्यात वरच्या चारही बाजूने शुद्ध हवा आणि प्रकाश येतो. गाभाऱ्याचे प्रवेशद्वार पूर्वेकडे आहे तर दक्षिण आणि उत्तर अशा दोन्ही दिशांना देखील द्वार आहेत. मात्र हे द्वार गर्दीच्या वेळी आणि महाशिवरात्रीला उघडले जातात. मंदिरात प्रवेश करताच दिसते ती मुकुटधारी शिवलिंग त्यानंतर पिंडीचे दर्शन घेण्यासाठी गाभाऱ्यामध्ये खाली उतरावे लागते. इथे पिंडीचे दर्शन घेऊन दुसऱ्या रस्त्याने वर येता येते. पायऱ्या चढूनवर आल्यानंतर समोर दिसते ती पुरातन विहीर, जी विटांमध्ये नक्षीकाम केलेले असल्यामुळे भाविकांना आश्चर्याने तोंडात बोट घालायला लावते. त्याच्या बाजूलाच बजरंग बली आणि ननागदेवता देखील स्थापित आहेत. परिसरामध्ये बेल ,पिंपळ अशा प्रकारची मोठमोठी झाडे असल्यामुळे परिसरात निसर्गरम्य वातावरण कायम असते.

Body:मंदिराच्या बाहेर एका बाजूला शिवानंद स्वामी महाराजांचे मंदिर आहे. या मंदिरात त्यांची मूर्ती देखील स्थापित आहे .भोले स्वराच्या मुख्य मंदिरासमोर दोन्ही बाजूंनी चिरेबंदी दगडांमध्ये दीपमाळा आहेत .सध्याच्या कलियुगात प्रत्येक गोष्ट नकली आणि दिखाऊ मिळते .अशा परिस्थितीत ही या चिरेबंदी दीपमाळा भाविकांना आकर्षित करतात. भक्तांच्या नवसाला पावणारा भोलेनाथ म्हणूनही ही या देवस्थानची ख्याती आहे. त्यामुळे श्रावणात जवळपास महिनाभर इथे महाप्रसादाचा कार्यक्रम सुरू असतो .मंदिराच्या भव्य दिव्य परिसरामुळे भाविक इथे येऊन पर्यटनाचाही आनंद घेतात. रिमझिम पडणाऱ्या पावसामध्ये बच्चेकंपनीही मनसोक्त आनंद लुटते.
****
मंदिराचा इतिहास
या मंदिराबद्दल लिखित स्वरूपात पुराणात माहिती सापडत नाही. मात्र सात-आठशे वर्षापूर्वीचे एक पुरातन शिवलिंग असलेले इथे एक छोटेसे मंदिर होते असे सांगितले जाते.या मंदिराचा शिवानंद स्वामी महाराजांनी जीर्णोद्धार करण्यास सुरुवात केली. आणि हळूहळू हे मंदिर नावारूपास आले.सद्या इथे मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे, येणाऱ्या भक्तांना इथे राहून सेवा करता यावी यासाठी इथे भक्त निवास बांधण्यात येत आहे.
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या उज्जैन येथील महाकालेश्वर या मंदिराच्या सरळ रेषेमध्ये हे मंदिर आहे .दोन्ही मंदिराचे अक्षांश रेखांश जवळपास सारखेच आहे .याच सोबत आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कावड दिंडी सोहळा गेल्या 22 वर्षांपासून सुरू आहे. ब्रह्मगिरी पर्वतावर उगम झालेल्या आणि पुढे वाहत येत शहागड पर्यंत आलेल्या गोदावरी गंगेचे पाणी कावडीच्या माध्यमातून आणून पिंडीला अभिषेक केल्या जातो.यावर्षी दिनांक 22 ऑगस्ट रोजी साडेबारा वाजता ही कावड दिंडी शहागड येथील गोदावरी गंगेचे पाणी घेऊन भक्त निघणार आहे. रविवार दिनांक 25 रोजी जालना शहरात आगमन होऊन मिरवणुकीच्या द्वारे रोहन वाडी मार्गे श्रीक्षेत्र भोलेश्वर बर्डी येथे मुक्कामी येणार आहे .त्यानंतर सोमवार दिनांक 26 रोजी भोलेश्वर भगवनला अभिषेक ,आणि काल्याचे किर्तन करून महाप्रसाद द्वारे कावड दिंडीचा समारोप होणार आहे. अनेक भक्त या दिंडीमध्ये सहभागी होतात. सध्या या संस्थानचे मठाधिपती म्हणून शिवप्रसाद सच्चिदानंद स्वामी महाराज हे कारभार पाहत आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.