जालना- एनआरसी आणि सीएए विरोधात उद्या (दि. २३ डिसेंबर) सकाळी दहा वाजता भोकरदन बंदचे आवाहन करण्यात आले आहे. या बंदच्या निमित्ताने भोकरदन शहरातील पोलीस ठाणे ते नवीन तहसील कार्यलयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. यामध्ये भोकरदन तालुक्यातील सर्व मुस्लिम समाज, सर्व समाज व सर्व पक्ष मोठया संख्येने सहभागी होणार आहेत. तरी सर्व भोकरदन शहरातील व्यापारी, फेरीवाले, दुकानदार यांनी भोकरदन बंदसाठी सहकार्य करवा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
हेही वाचा- कर्जमाफीच्या घोषणेनंतर भोकरदन मध्ये महाविकास आघाडीतर्फे फटाके उडवून निर्णयाचे स्वागत