ETV Bharat / state

गारपीटीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्या; शेतकऱ्यांची मागणी

author img

By

Published : Feb 20, 2021, 10:48 AM IST

गेल्या काही दिवसात राज्यात विविध ठिकाणी अवकाळी पावसासह गारपीट झाली. जालन्यातील भोकरदन तालुक्यात अनेक ठिकाणी गारपीट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Papaya
पपई

जालना - भोकरदन परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. नुकसान झालेल्या पिकांचे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
गारपीटीमुळे गहू, ज्वारी, हरभरा, कांदा आदी पिकांना मोठा फटाका बसला आहे. परिणामी शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.

गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे
फळ बागायतदाराला दहा लाखांचा फटका -

भोकरदन तालुक्यातील मालखेडा परिसरात वादळी वारा व गारपीटीमुळे मोठे नुकसान झाले. सांडू संपत घोडके यांच्या शेतातील दोन एकर डाळिंब, दीड एकर कांदा, एक एकर हरभरा आदी पिकांचे सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मालखेडामध्ये बाबूराव सुरासे, भगवान भिका घोडके, मधुकर मिरगे, सुधाकर सोनवणे, मुकुंदा मिरगे यांच्या पिकांचेही नुकसान झाले.

'या' गावांना बसला गारपीटीचा फटका -

भोकरदन तालुक्यातील इब्राहिमपूर, मालखेडा, गोकुळ, नांजा, बाभूळगाव, लिंगेवाडी, पेरजापुर, वाडी-खुर्द, वाडी-बुद्रुक, मनापूर, तडेगाव वाडी, आव्हाना, ठालेवाडी, भिवपूर, सुभानपूर या गावांना गारपीटीचा फटका बसला आहे. रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले.

संतोष दानवे यांनी केली पिकांची पाहणी -

आमदार संतोष दानवे यांनी भोकरदन परिसरात गारपीट झालेल्या मालखेडा, ठालेवडी, सुभानपूर, इब्राहिमपूर गावांना भेट दिली. त्यांनी नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये नुकसाभरपाई द्यावी, अशी मागणी संतोष दानवे यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.