भोकरदन - दिवाळीच्या मुहूर्तावर भोकरदन शहरात मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे. या शहरातील बाजारपेठेत दुकाने विविध साहित्यांनी सजली असून नागरिकांनीही या साहित्यांना पसंती दिली. त्यामध्ये लक्ष्मी मूर्ती, आकाशकंदील, बोळके, दिवाळी फटाके हे साहित्य आणि मिठाई, चिवडा, भाकरवडी, चकली, गुलाबजाम, लाडू, बंगाली मिठाई, काजुकतली, काजू मैसूर पाक, कलाकंद आदी फराळ खरेदी करण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे दिसून आले.
हेही वाचा - फटाक्याची दिवाळी तर कोणीही साजरा करतो, पण अशी दिवाळी कधी ऐकलेत का?
भोकरदन शहरात उत्सवाचे वातावरण असले तरी, परतीच्या पावसामुळे शेतकरी राजा चिंतेत आहे. या कारणामुळे शेतकऱ्यांची बाजारपेठेत गर्दीही कमी दिसून आली. शिवाय, सोनेही महागल्यामुळे इथल्या ज्वेलर्सच्या दुकांनांकडे नागरिकांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले आहे.