ETV Bharat / state

मंदिरे उघडण्यासाठी जालन्यात बंद मंदिरासमोर भजन आणि महाआरती - bhajan maha aarti close temple

मंदिरे उघडण्यात यावी, या मागणीसाठी जालन्यात बंद मंदिरासमोर भजनी मंडळींनी भजन आणि महाआरती केली. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी 'उद्धवा, अजब तुझे सरकार, बंद मंदिरे उघडे बार', असे म्हणत राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला.

bhajan and maha aarti in front of close temple jalna
जालन्यात बंद मंदिरासमोर भजन आणि महाआरती करताना भजनीमंडळ
author img

By

Published : Oct 13, 2020, 4:14 PM IST

जालना - उद्धवा अजब तुझे सरकार, बंद मंदिरे उघडे बार, असे म्हणत भाजपा पदाधिकाऱ्यांनी ठाकरे सरकारचा निषेध नोंदविला. मंदिरे उघडण्यात यावी, या मागणीसाठी भजनी मंडळींनी बंद मंदिरासमोर हनुमान चालीसा पाठ करत महाआरती केली. शहरातील बडी सडकवर श्रीराम मंदिरासमोर ही महाआरती आणि भजन करण्यात आले.

याबाबत प्रतिक्रिया देताना मनोज महाराज गौड.

बंद मंदिरासमोर जगदीश महाराज गौड यांच्या नेतृत्वाखाली भजनी मंडळींनी हनुमान चालीसाचा पाठ केला. त्याचवेळी या मंडळींना पाठिंबा म्हणून भाजपा कार्यकर्त्यांनीही रस्त्यावर उभे राहून राम नामाचा जप केला. यावेळी भाजपा पदाधिकारी भास्कर दानवे, सिद्धिविनायक मुळे, राजेश राऊत, रामेश्वर भांदर्गे, धनुभय्या काबलिये ,आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना मनोज महाराज गौड म्हणाले, गेल्या सहा महिन्यांपासून मंदिरे बंद असल्यामुळे भाविकांची कुचंबणा होत आहे. खरेतर ही मंदिरे उघडल्यानंतरच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होणार आहे. मात्र, सरकार उलटा निर्णय घेत आहे. सरकारने ही मंदिरे त्वरित उघडावीत आणि हिंदू धर्मियांच्या भावनांचा सन्मान करावा, अशी मागणीही ही त्यांनी केली.

हेही वाचा - परिवहन मंत्री अनिल परब कोरोनाबाधित, लीलावती रुग्णालयात दाखल

अनलॉक 5 महाराष्ट्र -

मिशन बिगीन अगेन अंतर्गत 5 ऑक्टोबरपासून बार, हॉटेल, रेस्टॉरंट 50 टक्के उपस्थितीत सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. तसेच डबेवाल्यांनाही ट्रेनमध्ये प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. त्यासाठी क्यूआर कोड काढून डबेवाल्यांना प्रवास करावा लागणार आहे. कोरोनामुळे मार्च महिन्यापासून देशासह राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. तेव्हापासून राज्यातील हॉटेल, बार बंद आहेत. सध्या अनलॉकची प्रकिया सुरू असून, त्यानुसार आता 5 ऑक्टोबरपासून बार, हॉटेल, रेस्टॉरंट 50 टक्के उपस्थितीत सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे.

राज्यात अनलॉक ५ संदर्भात मार्गदर्शक जाहीर झालेल्या सूचना -

  • हॉटेल, बार, रेस्टॉरंट ५ ऑक्टोबरपासून सुरू होणार
  • ५० % क्षमतेने हॉटेल, बार, रेस्टॉरंट सुरू करण्यास परवानगी
  • डबेवाल्यांना लोकल ट्रेनमधून प्रवास करण्यास परवानगी
  • अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकलच्या फेऱ्या वाढवणार
  • डबेवाल्यांसाठी क्यूआर कोड देण्यात येणार
  • राज्यात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वे सुरू करण्यास परवानगी
  • शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस ३१ ऑक्टोबरपर्यंत बंदच राहणार
  • मेट्रो सेवासुद्धा ३१ ऑक्टोबरपर्यंत बंदच राहणार
  • सिनेमागृह, स्विमिंगपूल, इंटरटेन्मेंट पार्क, थिएटर बंद राहणार
  • नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी तसेच प्रवास करताना चेहऱ्यावर मास्क लावणे बंधणकारक आहे.

या अनलॉक 5मध्येही मंदिर उघडण्यास परवानगी दिल्यामुळे भाजपाने राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.