ETV Bharat / state

कस्तुरबाडीत लाखोंचा अवैध गुटखा जप्त, बदनापूर पोलिसांची कारवाई - bdnapur police jalna

तालुक्यातील कस्तुरबाडी येथे एका घरामध्ये लाखो रुपयांचा गुटखासाठा असल्याची माहिती बदनापूर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून १ लाख २५ हजारांचा गुटखा व मोटार सायकल असा एकंदरीत १ लाख ७२ हजारांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीस ताब्यात घेतले. या घटनेने गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ माजली असून शहरातील सर्वच विक्रेत्यांनी टपऱ्या बंद करून पळ काढला आहे.

कस्तुरबाडीत लाखोंचा अवैध गुटखा जप्त
कस्तुरबाडीत लाखोंचा अवैध गुटखा जप्त
author img

By

Published : Feb 23, 2020, 11:21 PM IST

जालना - शासनाने बंदी घातलेली असतानादेखील शहरासह तालुक्यात अवैधरित्या विविध कंपन्यांचा गुटखा सर्रास विक्री केला जातोय. तर, औषध अन्न प्रशासन याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत असल्याने गुटका माफियांना सुगीचे दिवस आले आहेत. तालुक्यातील कस्तुरबाडी येथे एका घरामध्ये लाखो रुपयांचा गुटखासाठा असल्याची माहिती बदनापूर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून १ लाख २५ हजारांचा गुटखा व मोटार सायकल असा एकंदरीत १ लाख ७२ हजारांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीस ताब्यात घेतले. या घटनेने गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ माजली असून शहरातील सर्वच विक्रेत्यांनी टपऱ्या बंद करून पळ काढला आहे.

शासनाने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने विविध कंपन्यांच्या गुटखा विक्रीवर बंदी आणलेली आहे. मात्र, बदनापूर शहरासह तालुक्यात सर्रास गोवा, माणिकचंद आदी गुटख्यांची विक्री केली जाते. प्रत्येक टपऱ्यांवर विविध कंपनीच्या गुटख्यांची विक्री केली जात असताना औषध अन्न प्रशासन विभाग मात्र सोयीस्करपणे याकडे कानाडोळा करीत असल्याने गुटखा माफिया राजरोसपणे विक्री करीत आहेत. शहरासह तालुक्यातही गुटक्याची विक्री होत असताना अनेकवेळा पोलीस प्रशासनाने कारवाई केली. मात्र, शहरात येणारा माल ज्या व्यापाऱ्यांकडून येतो त्यांच्यावर पोलीस तपासात कारवाई झालेली नाही. त्यामुळे, यामागचे नेमके गुपित काय, असा प्रश्न निर्माण होत आहे.

२३ फेब्रुवारीला शहरातील शंकर नगर भागात कस्तुरवाडी येथील एक व्यक्ती काही किरकोळ दुकानदारांना गुटखा विक्री करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांना मिळाली. त्याआधारे त्यांनी सकाळी ११ वाजता सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख इब्राहिम, प्रेमदास वनारसे, शेख इस्माईल, करणसिंग जारवाल, चरणसिंग ब्राह्मवत, महिला पोलीस कर्मचारी पूजा वडगुजर यांनी सापळा रचला. दरम्यान, शंकरनगरमध्ये जनार्दन रामकिसन नेमाने याला मोटारसायकलसह ताब्यात घेऊन चौकशी केली असता, पिशवीमध्ये गोवा गुटख्याचे पॅकेट आढळून आले. घटनास्थळी पंचनामा करून आरोपीस पोलीस ठाण्यात आणण्यात आले. आरोपीस पोलिसी खाक्या दाखवितात त्याने तालुक्यातील कस्तुरवाडी येथील घरी माल असल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीस सोबत घेऊन कस्तुरवाडी गाठले असता घरात गुटख्याचे १२ पोते आढळून आले. सदर माल ताब्यात घेऊन पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून तब्बल १ लाख २५ हजारांचा गुटखा आणि 50 हजार किमतीची मोटारसायकल असा एकूण १ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. बदनापूर पोलिसांच्या या कारवाईमुळे गुटखा माफियांचे धाबे मात्र दणाणले आहेत.

बदनापूर तालुक्यातील कस्तुरवाडी येथे कित्येक दिवसापासून अवैध गुटखा विक्री केला जात होता, परंतु कोणतीच कारवाई होत नव्हती. राज्यचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अवैध गुटखा विक्री करणाऱ्या गुटखा माफियांवर मोक्का अंतर्गत कारवाही करण्यात यावी, असे आदेश दिल्यानंतर पोलीस प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासन खळबळून जागे झाले. बदनापूर तालुक्यातील जेमतेम १५०० लोकवस्ती असलेल्या कस्तुरवाडी या छोट्या गावात लाखोंच्या घरात गुटखा आढळून येतो. मात्र, पोलीस प्रशासन यावर कोणतीच कारवाही करत नाही हे कोडे मात्र अनुउत्तरीत आहे. परंतु आजच्या या करवाहिने पोलिसांनी आपली जबाबदारी पार पाडली.

हेही वाचा - जालन्यात वारिस पठाण यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांनी झोडपले

शासनाची बंदी असताना देखील तालुक्यात सर्रास गुटखा विक्री केली जात असल्याचे पोलीस कारवाईतून सिद्ध झाले आहे. परंतु, हा माल कोणत्या व्यापाऱयांकडून पुरवला जातो हे तपासातून निष्पन्न होणे अत्यंत गरजेचे आहे. मूळ व्यापाऱ्याला मुख्य आरोपी केल्यास या अवैध विक्रीला लगाम लावण्यात काही प्रमाणात यश येऊ शकते. मात्र, नेहमी पोलीस केवळ विक्री करणाऱ्यांवर कारवाई करून मोकळे होतात हे कटू सत्य आहे. बदनापूर शहरासह तालुक्यात अवैधरित्या गुटखासाठा मोठ्या प्रमाणात साठवलेला आहे. या प्रकरणात पोलीस व औषध प्रशासनाने सखोल चौकशी करून जनतेच्या आरोग्याला घातक असलेला गुटखा नष्ट करावा अशी आशा सर्व सामन्यांची आहे. मात्र, पोलिसांनी ११ ते २ या वेळेत १ लाख २५ हजारांचा गुटखा जप्त केला. तर, पुढील कारवाईसाठी औषध अन्न प्रशासनास कळवूनदेखील संबंधित अधिकारी रात्री उशिरा पर्यंत पोलीस ठाण्यात आले नाही, हे विशेष.

हेही वाचा - नोकरच निघाला चोर, जालन्यात चौघांना अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.